File photo
File photo 
विदर्भ

मुलींची संख्या वाढली

सकाळवृत्तसेवा

नागपूर : प्रत्येक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर कमी आहे. नागपूरही या प्रमाणाला अपवाद नाही. मात्र, नागपुरात मागील वर्षी मुलींच्या संख्येत वाढ झाल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे मुलांच्या जन्मताच मृत्यूच्या प्रमाणातही घट झाल्याने आरोग्याबाबत नागपूरकर दक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 904 आहे. यासाठी सरकारने "बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान राबविले. परंतु, राज्यस्तरावर या अभियानाचा लाभ झाल्याचे दिसून येत नाही. हजार मुलांमागे नागपुरातही मुलींचा जन्मदर कमी आहे. मात्र, 2018 मध्ये त्यापूर्वीच्या तीन वर्षाच्या तुलनेत निश्‍चितच मुलींची संख्या वाढल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील जन्म-मृत्यू विभागाने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीतून दिलासा देणारी आकडेवारी पुढे आली आहे. 2015, 2016, 2017 या वर्षात अनुक्रमे 27 हजार 542, 27 हजार 400 व 27 हजार 122 मुलींचा जन्म झाला. मात्र, 2018 या वर्षात 28 हजार 297 मुलींचा जन्म झाला. मुलींची संख्या वाढली असली तरी ती मुलांच्या तुलनेत कमीच आहे.
मागील वर्षी 30 हजार 106 मुले जन्मली. चार वर्षांत एक लाख 17 हजार 653 मुले तर एक लाख 10 हजार 361 मुलींचा जन्म झाला. याशिवाय एकूणच मुलांच्या जन्मताच मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली. मागील वर्षी जन्मताच दगावणारी मुले 75 असून, मुलींची संख्या 53 आहे. 2015 मध्ये मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 947 असा होता. मात्र, 2016 व 2017 मध्ये मुलींच्या जन्मदराचा आलेख खाली आला. मागील वर्षी मात्र पुन्हा आलेख वर आला. उपजत मृत्यूच्या प्रमाणातही सातत्याने घट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT