file photo
file photo 
विदर्भ

बारीक होण्यासाठी अघोरी उपाय

मनीषा मोहोड

नागपूर : नट्यांकडे बघून सध्या किशोरवयीन तरुणींमध्ये "झीरो फिगर'ची चांगलीच क्रेझ आहे. याकरिता अतिशय अघोरी व जीवघेणे प्रयोग केल्या जात असल्याने त्यांना विविध आजाराची लागण झाल्याचे तज्ज्ञांच्या निरीक्षणात समोर आले आहे. यामुळे परदेशातील मुलींमध्ये आढळणारा "ऍनोरेक्‍सिया' हा आजार आता महाराष्ट्रातही फोफावतो आहे.
मी किती जाड झालीय ना.. मला अजून थोडं बारीक झालं पाहिजे म्हणजे परफेक्‍ट फिगर वाटेल. मुलगी वयात आली की असे आरशासमोर उभे राहून होणारे संवाद अगदी कॉमन असतात. परंतु, शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही अतिबारीक म्हणजे सुंदर, साईझ झीरो वैगरे चुकीच्या संकल्पना रुळायला लागल्यामुळे सौंदर्याची परिमाणे बदलली आहेत. बारीक होण्यासाठी किशोरवयीन मुली आता खाल्लेलं अन्नही मुद्दाम उलटी करून, बाहेर काढत असल्याचे प्रकार वाढले आहेत. नागपूरमधील स्रीरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञांनी ही निरीक्षणे नोंदवली असून, याबाबत वैद्यकीय क्षेत्रात संशोधन सुरू आहेत. डाएटच्या नावाखाली उपाशी राहणे आरोग्याला धोकायदायक असून, यामुळे किशोरवयातच टी. बी., ऍनिमिया, हाडांचा ढिसूळपणा, निद्रानाश आदी गंभीर समस्यांना तरुण वयात मुलींना सामोरे जावे लागत आहे. त्यापुढची पायरी आहे क्षुधानाश.. अर्थात "ऍनोरेक्‍सिया.' परदेशात ऍनोरेक्‍सिया झालेल्या किशोरवयीन मुलींची संख्या वाढली असतानाच. आता महाराष्ट्रातही मुंबई, पुणे या शहरानंतर हा आजार नागपूरसारख्या मोठ्या शहरातही फोफावत असल्याची माहिती वैद्यकीयतज्ज्ञांनी दिली.
ऍनोरेक्‍सिया कसा ओळखावा?
एखाद्या व्यक्तीला वजन वाढण्याची किंवा जाड होण्याची भीती वाटत राहते. क्षुधानाश झालेल्या व्यक्ती त्यांचे जेवण कमालीचे कमी करतात. त्यांच्या खाण्याच्या पद्धतीही विचित्र होत जातात. जेवणाचे छोटे तुकडे करणे किंवा ते ताटामध्ये फिरवणे. हवामान खराब असो धावपळीचा दिवस असो की तब्येत बिघडलेली त्या सतत व्यायाम करण्यात गुंतलेल्या असतात. लघवी होण्यासाठी गोळ्या घेणे (वॉटर पिल्स किंवा डाययुरेटिक्‍स), शौचाला व्हावे म्हणून (एनिमा किंवा लॅक्‍झेटिव्ह) किंवा भूक कमी व्हावी यासाठीही (डाएट पिल्स) ते गोळ्या घेतात.
"ऍनोरेक्‍सिया नऱ्होसा' हा एक सायकोसोमॅटिक विकार असून यामुळे शरीराला अत्यंत गरजेची असलेली प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्‌स, फॅट्‌स तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नाहीत. विकारामुळे शरीर उपासमार होईपर्यंत अन्नाचा त्याग करत राहते. यामुळे प्रतिकार शक्ती कमी होऊन, टी.बी, रक्ताक्षय, हाडांचे विकार, वंधत्व अशा समस्या येतात.
-डॉ. चैतन्य शेंबेकर, स्रीरोगतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT