संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

खाद्यपदार्थ विक्रेत्याचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चार आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व झाऱ्याने डोक्‍यावर फटके हाणून चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याची निर्घृण हत्या केली. शनिवारी रात्री लुंबिनीनगर परिसरात ही थरारक घटना घडली. केवळ दोनशे रुपयांच्या उधारीचा वाद विकोपाला जाऊन हे हत्याकांड घडल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
ऋषभ मातने (24) रा. लुंबिनीनगर, मेकोसाबाग असे मृताचे नाव आहे. आकाश थापा (23), अनॉल्ड ऊर्फ शेल्टीन (22), राज मेहता (23) व त्यांच्या अन्य एका साथीदाराने मिळून ऋषभचा खून केला. सुमारे वर्षभरापासून ऋषभ जरीपटका चौकात चायनीजचा ठेला लावत होता. प्राप्त माहितीनुसार आरोपीसुद्धा याच व्यवसायाशी निगडित आहे. आकाशकडे ऋषभचे 200 रुपये उधार होते. तो पैसे परत देत नसल्याचे ऋषभ सर्वांना सांगत होता. यामुळे आकाशला अपमानीत झाल्यासारखे वाटत होते. शनिवारी सायंकाळी आकाश अन्य तीन आरोपींसह ऋषभच्या ठेल्यावर गेले. इच्छेनुसार पदार्थ खाऊनही पैसे दिले नाही. यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. ऋषभचा दिव्यांग मित्र अज्जूला थापड मारून आरोपी निघून गेले. यानंतर रात्री 9.45 वाजताच्या सुमारास मृतक मित्रासह गड्डीगोदाम येथे गेला. दुकानासाठी लागणारे सामान घेऊन परतत असताना आरोपींनी लुंबिनीनगरातील राजेश सलूनसमोर त्यांना रोखले. एकाने लोखंडी रॉडले ऋषभच्या डोक्‍यावर फटका हाणला. नंतर इतरांनी झाऱ्याने हल्ला चढविला. काहींनी दगड, विटांनीही मारले. आरोपींच्या भीतीपोटी कुणीही त्याला वाचवायला समोर आले नाही. त्याच्यासोबत असणारा मित्रही पळून गेला. आरोपी निघून गेल्यावर ऋषभला मेयो रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोवर उशीर झाला होता. डॉक्‍टरांनी तपासताच मृत घोषित केले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विवाह ठरला औध घटकेचा
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभच्या आईवडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. आजी व दोन मामांनी त्याला लहानाचे मोठे केले. त्याची लहान बहीण पुण्याला नोकरी करते. ऋषभचे पूर्वी कडबी चौकात चहाचे दुकान होते. ते मामाला चालविण्यासाठी देऊन त्याने चायनीजचा ठेला लावणे सुरू केले होते. दरम्यान, त्याने परिसरातीलच एका युवतीशी प्रेमविवाह केला. पण हे लग्न औध घटकेचेच ठरले.
घटनेचे संतप्त पडसाद
घटनास्थळाजवळच अवैध दारूविक्रीचे अड्डे आहेत. आरोपी त्यापैकी एका अड्ड्यात घात लावून बसले होते. ऋषभवर हल्ला चढविला असता एक दारूविक्रेता त्यांना चिथावत होता. घटनेनंतर संतप्त जमावाने दारू अड्ड्याची तोडफोड केल्याची माहिती पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT