Rape-Tried
Rape-Tried 
विदर्भ

गुंडाचा डॉक्‍टरवर बलात्काराचा प्रयत्न

सकाळवृत्तसेवा

नागपूर - शहरातील कुख्यात गुंड पवन मोरयानी याने पाचपावलीतील एका नामांकित हॉस्पिटलमधील महिला डॉक्‍टरला शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार देताच आरोपीने डॉक्‍टरवर बलात्काराचा प्रयत्न केला. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय महिला डॉक्‍टर शर्मिला (बदललेले नाव) ही पाचपावलीतील कमाल चौकात एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून डॉक्‍टर आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पवन मोरयानीने त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी पवन हा हॉस्पिटलमध्ये मुक्‍कामी होता. दरम्यान, त्याच्या आईवर उपचार करणारी डॉ. शर्मिला हिच्याशी त्याची ओळख झाली. आईवर जवळपास १५ ते २० दिवस उपचार झाल्यानंतर रुग्णाचा नातेवाईक म्हणून डॉ. शर्मिला यांनीही मैत्री केली. 

रुग्णाच्या तब्बेतीची माहिती देण्यासाठी पवन मोरयानीने डॉ. शर्मिलाचा मोबाईल क्रमांक घेतला. मात्र, आईची प्रकृती ठीक झाल्यानंतरही शर्मिला यांना मॅसेज करीत होता. तसेच गुलाबाचे फुले, प्रेमाचे मॅसेज तसेच ‘लव्ह यू’चे मॅसेज पाठवीत होता.

पाच जानेवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास पवन मोरयानी हॉस्पिटलमध्ये गेला. त्यावेळी त्याने आठ ते दहा साथीदार हॉस्पिटलखाली उभे केले होते. त्याने डॉ. शर्मिलाच्या कॅबीनमध्ये घुसला. ‘तू माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुझी बदनामी करतो.’ नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. घाबरलेल्या डॉ. शर्मिला यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी गोळा झाले. मात्र, त्याने खाली उभे असलेल्या गुंडाची भीती दाखवली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी डॉ. शर्मिला यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नव्वामुळे मोरयानी ‘लाइम लाइट’मध्ये 
नंदनवनमध्ये राहणारा कुख्यात गुंड मारूती नव्वा ऊर्फ कालूराम याचा ‘गेम’ करण्यासाठी पवन मोरयानीने तयारी केली होती. तेव्हा पवन मोरयानीने नव्वाला फोनवरून ‘तेरा चौक में मर्डर करूंगा’ अशी धमकी दिली होती. तेव्हापासून पवन मोरयानी नावाचा गल्लीतील गुंड ‘डॉन’ची बिरुदावली लावत होता, हे विशेष.

पवन मोरयानी फरार
गल्लीगुंड म्हणून ओळखला जाणारा पवन मोरयानी याने गुन्हा दाखल होताच शहरातून पळ काढला. त्याने महिला डॉक्‍टरला तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांच्या भीतीपोटी त्याने थेट आता राज्याबाहेर बस्तान मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तक्रार मागे घेण्यासाठी काही गुंड डॉक्‍टरच्या घराच्या परिसरात पाठविल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT