नागपूर : फित कापून प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शेजारी बांधकाम विभागाचे सचिव सी. जोशी, उल्हास देबडवार व इतर अधिकारी.
नागपूर : फित कापून प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शेजारी बांधकाम विभागाचे सचिव सी. जोशी, उल्हास देबडवार व इतर अधिकारी. 
विदर्भ

कमी खर्चात बांधणार दर्जेदार रस्ते

सकाळवृत्तसेवा

कमी खर्चात बांधणार दर्जेदार रस्ते
नागपूर : भारत विकसनशील देश असल्याने आर्थिक मर्यादा आहेत. त्यावर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च कमी करायचा आहे. कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे हेच प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली इंडियन रोड कॉंग्रेसच्या (आयआरसी) चार दिवसीय अधिवेशनाला आजपासून मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या तांत्रिक (टेक्‍निकल) प्रदर्शनाचे उद्‌घाटन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयआरसीचे सचिव निर्मल कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी, मुख्य अभियंता आणि आयआरसी आयोजन समितीचे अध्यक्ष उल्हास देबडवार, स्थानिक आयोजन समितीचे सचिव रमेश होतवानी आणि अधीक्षक अभियंता सरदेशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, आयआरसीच्या अधिवेशनात तांत्रिक शोधपत्रे आणि नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यात येणार आहे. यातून निश्‍चित होणारी नियमावली आणि मानकांचा फायदा देशातील सर्व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना होणार आहे. सोबतच सरकारचा पायाभूत सुविधांवर भर असून टाकाऊ वस्तू, कचरा आणि राखेपासून रस्ते निर्मितीमधील साहित्यांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
प्रदर्शनामध्ये सुमारे 200 स्टॉल्स लावले असून, यात अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान सादर करणारे प्रदर्शन लावले आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सना भेट दिली आणि माहिती जाणून घेतली. व्हीएनआयटी, महावितरण, नागपूर मेट्रो, बीएसएनएल यांच्यासह अनेक कंपन्यांचे प्रदर्शन लावले आहे. जनआक्रोश संस्थेद्वारे रस्ते सुरक्षेसंदर्भातील जनजागृती करणारा स्टॉल लावला आहे.
विजेत्यांचा सन्मान
आयआरसीच्या तांत्रिक प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी इंडियन रोड कांग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. रस्ते सुरक्षा जनजागृती प्रश्नमंजूषा कार्यक्रमांची विजेता लीना भाटे, सर्वोत्कृष्ठ पथनाट्य प्रस्तुतीकरिता दृष्टी लर्निंग सेंटर स्कूल, निबंध स्पर्धेत पूनम चौधरी, चित्र स्पर्धेत फाईन आर्ट श्रेणीत राहुल गेडाम तसेच महाविद्यालय गटामध्ये सेल्वन फ्लोरील यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
"सोनू, तुला इंजिनिअरवर भरोसा नाय का?'
उद्‌घाटन समारोहप्रसंगी शंकर शंखपाळे दिग्दर्शित प्रकाश देवा लिखित "सोनू, तुला इंजिनिअर वर भरोसा नाय का' नाटक सादर करण्यात आले. यात रस्ते बांधणीकरिता वापरण्यात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे पहिलेच्या तुलनेत आता लांबचा प्रवास कमी वेळात आणि सुरक्षित कसा झाला, याविषयी माहिती देण्यात आली. सुचिता देबडवार, स्मिता बोरकर, सीमा देव, भारती कुंभलवार, शेफाली पुंजरवार, पल्लवी उरकुडे, वैशाली गोडबोले, संगीता होतवानी व चित्रा महाजन यांनी यात सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT