file photo
file photo 
विदर्भ

Maharashtra Vidhan sabha 2019 चार राज्यांतील होमगार्ड बंदोबस्ताला 

राजेश रामपूरकर

नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने बंदोबस्तासाठी चार राज्यांतील होमगार्डची मदत घेण्यात आली आहे. त्यात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांचा समावेश आहे. या चार राज्यांतून तब्बल 20 हजारांवर होमगार्ड महाराष्ट्रातील बंदोबस्तात तैनात राहतील. 
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी राज्यात भरारी पथके, तपासणी नाके सुरू केले आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांकडून बंधपत्र लिहून घेण्यात येत आहे. मतदानाचा दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त नेमला जात आहे. मतदान केंद्र, मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी सशस्त्र दलाच्या जवानांचा पहारा असते. त्यामुळे विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांच्या गृह विभागातून होमगार्ड मागविले आहेत. त्यानुसार 20 हजार होमगार्डस उपलब्ध करून देण्यासंबंधी राज्यांनी सहमती दर्शवली आहे. या होमगार्डच्या वेतनासाठी सरकारने 8 कोटी 77 लाख 9 हजार रुपयांचा ऍडव्हान्सही दिला असल्याचे समजते. 
राज्यात लाखाच्या घरात मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे केंद्राबाहेर, केंद्रात असा पोलिस बंदोबस्त तैनात असतो. निवडणुकीच्या वेळी मोठा बंदोबस्त लागतो. राज्यात एकाच वेळी मतदान असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त मिळणार नाही. त्यामुळे इतर राज्यातील 20 हजार होमगार्डची मदत घेण्यात आली आहे. 
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT