Increase the per capita income of the district 
विदर्भ

जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवणार

सकाळवृत्तसेवा

वाशीम : मानव विकास निर्देशांक कमी असल्याने वाशीम जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांची निर्मिती करून दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना राज्य शासनाकडून सहकार्य केले जाईल. जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनमध्ये आज (ता.२८) झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

        यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार अमित झनक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक लीना बन्सोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक यांनी प्रारूप आराखड्याविषयी सादरीकरण केले.

        यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, २०१९-२० मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून सुरू असलेली सर्व विकास कामे चांगल्या दर्जाची होणे आवश्‍यक आहे. तसेची ही कामे विहित कालवधीत पूर्ण करावीत. विकास करण्यात आलेला निधी विहित मुदतीत पूर्णपणे खर्च होईल, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत.

        सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ करिता जिल्ह्याला १०५ कोटी रुपये नियतव्यय व आकांक्षित जिल्हा म्हणून २५ टक्‍के अतिरिक्त नियतव्यय निश्‍चित करण्यात आला होता. मात्र, कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी आणि जिल्ह्यातील विकास कामांची गरज लक्षात घेवून जिल्ह्यासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या एकूण नियतव्ययाची मर्यादा १६३ कोटी रुपये इतकी निश्‍चित करण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. वाढीव निधीतून प्राधान्याने ग्रामीण भागातील सुविधा निर्मितीची कामे पूर्ण करावीत. तसेच पोलिस दलाला अद्ययावत वाहने देणे, भारतीय जैन संघटनेच्या सहभागातून जलसंधारण व पांदन रस्त्यांची कामे करण्यासाठी इंधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

        जिल्ह्यातील कृषिपंप वीज जोडणीच्या कामांना गती द्यावी. जिल्ह्यातील पाच एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवून १० एमव्हीए करण्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलता दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

Vaibhav Taneja : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चा खजिनदार भारतीय वंशाचा; कोण आहे सीएफओ वैभव तनेजा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'इतका' पाणीसाठा

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनांची यादी जाहीर; कोण ठरणार सर्वोत्कृष्ट? 'या' चित्रपटांमध्ये चुरस

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

SCROLL FOR NEXT