Aahar.jpg
Aahar.jpg 
विदर्भ

तुमची ‘इम्यूनिटी’ असेल टाईट तर, ‘कोरोना’शी कराल फाईट

अनुप ताले

अकोला : कोणतेही युद्ध करायचे आणि जिंकायचे असेल तर, योद्ध्याला सशक्त असणे सर्वात महत्त्वाचे असते. आताही कोरोना सोबतचे युद्ध जिंकायचे असेल तर, प्रत्येकाला सशक्त बनणे गरजेचे आहे आणि त्यासाठी स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे, नाशिक येथील एच.सी.जी. कॅन्सर सेंटरच्या क्लिनिकल डायटेशीयन धनश्री सरप यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर, रोजच्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे फळे घेणे आवश्यक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संत्री, लिंबू, स्वीट लाईम, अंगुर, पेरू, पपई, लसूण, आले, पालेभाज्या इत्यादीचा समावेश असणे आवश्यक असल्याची माहिती, धनश्री सरप यांनी दिली तसेच पुढील प्रमाणे दैनंदिन आहार घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासोबतच संसर्गजन्य आजार रोखता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फळे व त्यामधील पोषक घटक
संत्री : संत्र्यांमध्ये जीवनसत्त्व 'सी' अधिक प्रमाणात असते, जे शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी मदत करते आणि पांढरपेशी मनुष्याला संसर्गापासून वाचवितात.

अंगुर : अंगूर मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. मिनरल्स आणि पाण्याचे प्रमाणही जास्त असते. अँटीऑक्सीडेंट सुद्धा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि फॉरेन पार्टिकल्सला शरीरामध्ये येण्यापासून रोखतात.

लिंबू : लिंबू हे जीवनसत्व 'सी' चे सर्वाधिक प्रमाण असणारे फळ आहे. त्यामुळेच रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी लिंबू हे सर्वात महत्त्वाचे काम करते.

लसूण : लसूण मध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर कंपाउंड असतात, ते माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्ग होण्यापासून वाचविता.

ही फळेसुद्धा आहारात महत्त्वाची
पेरू, पपई व लिंबूवर्गीय असलेले फळ स्वीट लाईम सुद्धा आहारात महत्वाचे असून, ते आहार डिटॉक्स आणि संसर्ग रोखण्यासाठी मदत करतात.

असा घ्या आहार आणि बना सशक्त
सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी प्यावे. त्यानंतर लेमन टी किंवा ग्रीन टी घ्यावी. लेमन किंवा ग्रीन टी मध्ये जीवनसत्त्व सी आणि अँटीऑक्सीडेंट प्रॉपर्टीज आहेत, त्या पहाटे शरीरात लवकर शोषल्या जातात. त्यानंतर प्रोटीन व फायबर अधिक असणारा नाश्‍ता घ्यावा (फायबर शरीरातील अपचनीय पदार्थ बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात). दहा मिनिटानंतर जाड साल असणारी फळे खावीत आणि त्यानंतर काही अवधीनंतर जेवण करावे. जेवणामध्ये भाज्यांचे प्रमाण अधिक असावे. लसूण सुद्धा असावा. दुपारी चार वाजता पुन्हा फलाहार घ्यावा, ज्यामध्ये संत्री, सफरचंद, स्वीट लाईम, डाळिंब, पेरू, किवी, अंगूर, पपई यापैकी फळांचा समावेश असावा. रात्री हलके व पचनीय जेवण घ्यावे.

हे सुद्धा लक्षात असू द्या

  • सर्व पालेभाज्या मिठाच्या पाण्याने धुऊन घ्याव्यात.
  • जाड सालीचे सर्व फळे खावीत.
  • सर्व पदार्थ शिजवूनच खावीत.
  • दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यावे.
  • आहारात हळदीचा वापर करावा.

दिवसातून एकदा डिटॉक्स ड्रिंक घ्या
काकडीच्या पाच ते सहा कापा, लिंबूच्या चार ते पाच कापा, सात ते आठ पुदिनाची पाणी, अर्धे सफरचंद किंवा संत्री किंवा कोणतेही फळ, एक ग्लास पाणी. सगळे पदार्थ पाण्यामध्ये टाकून रात्रभर फ्रीजमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवावे. सकाळी ब्रश झाल्यावर पाणी गाळून हे डिटॉक्स ड्रिंक प्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT