increase security pressure on police force in nagpur
increase security pressure on police force in nagpur 
विदर्भ

पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढला ताण; होमगार्डचा बहिष्कार कायम 

अनिल कांबळे

नागपूर - राज्यातील होमगार्ड जवानांनी गणेशोत्सवातील बंदोबस्तावर बहिष्कार घातल्यामुळे पोलिस विभाग अडचणीत सापडला आहे. होमगार्ड अभावी पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढल्याने कायदा व सुव्यवस्था प्रभावीत झाली आहे. परिणामी, तपास आणि गस्तीसाठी पोलिस बळ अपुरे पडत असल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे उघड झाले आहे. 
राज्यात गणेशोत्सवापासून खऱ्या पोलिस बंदोबस्ताची परिक्षा असते. मात्र, होमगार्ड जवानांची साथ नसल्याने बंदोबस्ताचा ताण पोलिसांवर वाढला आहे. होमगार्डच्या न्याय मागण्या मान्य होत नसल्यामुळे होमगार्डसनी बंदोबस्ताव बहिष्कार घातला आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त मालिका प्रकाशित करुन होमगार्डचा लढा उभारला आहे. 

याचा फटका पोलिस दलाला बसला. पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, औरंगाबाद या शहरात तर होमगार्ड जवान नसल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था प्रभावीत झाली आहे. नागपुरात गेल्या पाच दिवसांत पाच खूनी हल्ले झाले तर तर दोघांचा खून झाला. पोलिस कर्मचारी गणेशबंदोबस्तात व्यस्त आहेत. त्यामुळे गस्तीवर पोलिस कर्मचारी कमी पडत आहेत. पोलिसांना सध्या होमागार्डची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी एनसीसी कॅटेड आणि रस्ता सुरक्षा पथक (आरएसपी) यांना बंदोबस्तासाठी घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो प्रस्ताव शाळा-महाविद्यालय आणि पालकांनी धुळकावून लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस एकाकी पडले असून त्याचा परिणाम शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर होत आहे. 

तपासापेक्षा बंदोबस्तावर भर -
पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांसोबत तपास कामी बाहेर जायचे असते किंवा तपासात मदत करायची असते. मात्र, बंदोबस्तात कर्मचारी वाढविल्यामुळे तपासकामाला खिळ बसली आहे. अधिकारी एकटे पडले आहेत तर कर्मचारी बंदोबस्ताचा ताण सहन करावा लागत आहे. 

एनसीसी कर्नल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बंदोबस्तासंदर्भात चर्चा सुरू आहे. एनसीसीचे कॅटेड बंदोबस्तासाठी मिळण्याची शक्‍यता आहे. होमगार्डचा पर्याय म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या एनसीसी पथकाच्या सहकार्याच्या प्रतिक्षेत आहोत. 
- एस. निर्मला देवी (पोलिस उपायुक्‍त, विशेष शाखा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT