File photo
File photo 
विदर्भ

सर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद

सकाळवृत्तसेवा

वर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात घेतले. गोपुरी चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
आशीष देवीदास सालोडकर (वय 22), आकाश सुधाकर कौरती (वय 27), नीतेश अरुण चहांदे (वय 24) व गोविंद वसंत जाधव (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चारही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.
मांडोळ साप गोपुरी चौक परिसरात कोणीतरी तब्बल 14 लाख रुपयांत विकत असल्याची माहिती पीपल फॉर ऍनिमल्सला मिळाली. या सर्प तस्करांना पकडण्याकरिता पीपल फॉर ऍनिमल्सच्या सदस्यांनी सर्प खरेदीबाबत चांगली प्रलोभने दिली. सोबतच याबाबत वर्धा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळविण्यात आले. या घटनेची गांभीर्याने दाखल घेत परिसरात तत्काळ सापळा रचण्यात आला. पीपल फॉर ऍनिमल्स व वन विभागाच्या संयुक्त चमूने अनेकवेळा सौदेबाजी केली. शेवटी गोपुरी चौक येथे 14 लाख रुपयांत साप विकत देण्याचे ठरले. या ठिकाणी साप विकणाऱ्या टोळीचे नऊ ते दहा सदस्य महागड्या दुचाकीसह दाखल झाले. घटनास्थळी दबा धरून बसलेल्या संयुक्त चमूतील सदस्यांनी साप खरेदीच्या गोष्टीत तस्करांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. साप हातात घेताच चार जणांना पकडण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यातून पकडले होते चार कोटींचे साप
वर्ध्यात पकडण्यात आलेल्या या सर्प तस्करांच्या टोळीचे मूळ बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथे आहे. चार महिन्यांपूर्वी पीपल फॉर ऍनिमल्सच्या सदस्यांनी येथे कारवाई करून चार कोटींचा सौदा मोडीत काढला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT