Lalit Tutoriyal
Lalit Tutoriyal 
विदर्भ

ललीत ट्युटोरियलचे अवैध बांधकाम पाडले

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  तोष्‍णीवाल ले-आउट येथील ललीत काळपांडे यांच्या ललीत ट्युटोरियल या शिकवणी वर्गाच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम बुधवारी महानगपालिकेतर्फे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. येथे पार्किंगच्या जागेवर क्लास रूम बांधलेली आढळून आली तर मंजूर नकशापेक्षा 600 चौरस मीटर जास्तीचे बांधकाम आढळल्याने महानगरपालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी सहा अनधिकृत इमारतींचे बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली होती. या इमारती पाडण्याचे काम बुधवारीही सुरू होते.


मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी पूर्व झोनमधील ट्युशन क्‍लासेसच्‍या बांधकामांची पाहणी बुधवारी केली. यामध्‍ये तोष्‍णीवाल ले-आउट येथील ललीत काळपांडे यांच्या ललीत ट्युटोरियलचाही समावेश होता. येथे मंजूर नकाशा प्रमाणे 500 चौरस मीटर बांधकाम हवे होते. प्रत्‍यक्षात 1100 चौरस मीटर बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले. या इमारतीत 600 चौरसमीटर बांधकाम अधिक करण्यात आले. याशिवाय मंजूर नकाशाप्रमाणे पार्कींगसाठी हवे असलेल्या जागेवर क्‍लासरूम बांधण्यात आली असल्याचे आढळले. उत्‍तरे कडील समास अंतरामध्‍ये ३ मीटर जागा सोडणे आवश्‍यक असताना काहीही जागा सोडली नाही. शिकवणी वर्गासारख्या इमारतीमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळणे आवश्‍यक असताना इमारतीच्या बांधकामातच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. इमारत मालकाने स्वतःहून या इमारतीचा उर्वरित अनधिकृत भाग पाडावा यासाठी २४ तासांची मुदतही मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.

ललित काळबांडे यांना एक लाखाचा दंड
ललीत ट्युटोरियलच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणात क्लासचे संचालक ललित काळबांडे यांना एक लाखाचा दंड करण्यात आला. याशिवाय गीतानगर येथील सरोज अग्रवाल, दत्‍त कॉलनीतील सुनील हातेकर, अंकीत अग्रवाल यांना प्रत्येकी एक लाख तर नंदलाल आलिमचंदानी यांना 50 हजार रुपये असे एकूण 4 लक्ष 50 हजार रुपयांचा दंड मनपातर्फे आकारण्यात आला.


आयुक्तांकडून कारवाईची पाहणी
महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरातील अनधिकृत इमारतीविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईची पाहणी केली. काही इमारतींना त्यांनी स्वतः भेटी दिल्यात. विशेषतः शहरातील शिकवणी वर्गाच्या टोलेजंग इमारतींची त्यांनी पाहणी केली. त्यामुळे या शिकवणी वर्गाच्या इमारती मनपाच्या रडारवर आल्या आहेत.


बांधकाम व्यावसायिकांची मनपा धाव
अनधिकृत इमारतीविरुद्ध महानगरपालिकेने मंगळवारपासून कारवाई सुरू केली. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी थेट महानगरपालिकेत धाव घेवून अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT