गडचिरोली : गोगाव येथील रस्त्यालगतचा वाळूसाठा तसेच जेसीबी व इतर वाहने.
गडचिरोली : गोगाव येथील रस्त्यालगतचा वाळूसाठा तसेच जेसीबी व इतर वाहने. 
विदर्भ

अवाढव्य वाळूसाठा देतोय अपघाताला आमंत्रण

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : येथून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या गोगाव येथील रस्त्याला लागूनच मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करण्यात आला असून या वाळूच्या ढिगाऱ्यातून वाळू काढून वाहतूक करण्यासाठी जेसीबीसारखे अवाढव्य वाहन रस्त्यावर उभे ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून हा वाळूसाठा अपघाताला आमंत्रण देत आहे.
वैनगंगा नदीघाटातून उपसा केलेल्या वाळूचा मोठा साठा येथील मुख्य मार्गावरून गोगावकडे जाणाऱ्या मार्गावर करण्यात आला आहे. हा केवळ साठा नसून वाळूचा मोठा डोंगरच इथे उभारण्यात आला आहे. हा साठा अगदी रस्त्याला लागून आहे. खरेतर येथे वाळूसाठा करताना रस्त्यावरील वाहतुकीला अडचण होईल, हे लक्षात घ्यायला हवे होते. पण, ही बाब व नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा खनिकर्म विभाग व महसूल विभागाने लक्षात घेतलेला दिसत नाही. गुड्डू कोल्हे नामक वाळू कंत्राटदाराची ही वाळू आहे. विशेष म्हणजे हा वाळूचा डोंगर मागील अनेक महिन्यांपासून येथे आहे. विशेष म्हणजे येथील सिंधूताई पोरेड्डीवार महाविद्यालयाच्या लगतच हा वाळूसाठा करण्यात आला आहे.
त्यामुळे या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या साठ्यातून वाळू काढून ट्रकमध्ये भरण्यासाठी अवाढव्य जेसीबी मशीन वापरण्यात येत आहे. ही मशीन रस्त्यावरच ठेवून ट्रकमध्ये वाळू भरण्यात येते. त्यामुळे जेसीबी व त्याच्यामागे उभे असलेले ट्रक यामुळे हा रस्ता अक्षरश: अडवला जातो. आधीच हा रस्ता अरुंद असताना या वाळूच्या डोंगरामुळे व येथे तासन्‌तास उभ्या राहणाऱ्या जेसीबी, ट्रकसारख्या अवाढव्य वाहनांमुळे येथे अपघाताची भीती वाढली आहे. वर्दळीच्या रस्त्याला लागून वाळूसाठा करण्याची परवानगी कंत्राटदाराला दिली, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. येथे एखादा मोठा अपघात घडल्यावर प्रशासनाला जाग येईल काय, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. संबंधित विभागाने हा वाळूसाठा अन्यत्र हटवून ही समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात खनिकर्म अधिकारी शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT