विदर्भ

घर पाहावे उचलून..!; जॅकने वाढविली घराची उंची (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

नागपूर - ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ऐवजी ‘घर पाहावे उचलून’ अशी सुधारणा  करण्याची वेळ आली आहे. टेका नाका परिसरातील हरपालसिंग मेहता यांनी चक्क घर जॅकच्या साहाय्याने उचलून पायाची उंची वाढविण्याचे काम सुरू केले आहे. नागपुरात हा पहिलाच प्रयोग असल्याने नागरिकांसाठी ही प्रणाली उत्सुकतेचा विषय ठरला असून दररोज त्यांच्या घरी मोठी गर्दी होत आहे. 

शहराचा जसा विकास होत आहे, त्यामुळे रस्ते उंच झाले असून घरे खड्ड्यात गेली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरत असल्याने अनेक नागरिक वैतागले आहेत. परंतु, पर्याय नसल्याने प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत ते दिवस काढताहेत. मात्र, टेका नाका परिसरातील बुधाजीनगरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हरपालसिंग मेहता यांनी नवा पर्याय शोधून काढला. किंबहुना ज्याची घरे खड्ड्यात गेली व पावसाचे पाणी शिरते, अशांना त्यांनी मार्ग दाखविला म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सिमेंट रस्ते उंच झाल्याने घर खोलगट भागात गेले. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यात घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी जमा होत असल्याने हरपालसिंग मेहता वैतागले होते. त्यांनी १९९३ मध्ये निर्मित हे घर पाडून नवीन बांधण्याचाही विचार केला. मात्र, घर न पाडता व उंची वाढविणे शक्‍य असल्याचे त्यांना कळले. त्यांनी मुलगा इंद्रजितला सोबत घेऊन ‘यू ट्यूब’वरून या प्रणालीची माहिती घेतली. ‘यू ट्यूब’वरच बिल्डिंग लिफ्टिंगची कामे करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा शोध घेतला. हरयाना येथील सिंग बिल्डिंग लिफ्टिंग कन्स्ट्रक्‍शन कंपनीसाठी लागणारा खर्च, जोखीम आदीवर चर्चा केली. 

सारे  काही सकारात्मक जुळून आले. त्यामुळे या कंपनीने २५ जानेवारीपासून बिल्डिंगला उंच उचलण्याचे काम सुरू केले. हे काम करण्यासाठी बिहारमधील १६ पारंगत मजूर असून आजपर्यंत त्यांनी जॅकच्या साहाय्याने घर दीड फूट उंच उचलले. एका महिन्यात घराची तीन फूट उंची वाढविण्याचे काम पूर्ण होईल, असे या कामाची देखरेख करीत असलेल्या बिहार येथील विकासकुमार यांनी सांगितले. 

घरात दरवर्षी पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचत होते. अखेर त्रस्त होऊन बिल्डिंगची उंची वाढविण्याचे तंत्रज्ञान यूट्यूबवर शोधले. कंपनीशी संपर्क केला. आतापर्यंत घराची दीड फुटापर्यंत उंची वाढविण्यात आली असून साडेसहा लाख रुपये खर्च आला. आणखी दीड फूट उंची वाढविण्यात येणार असून एवढाच खर्च पुन्हा येणार आहे. 
- इंद्रजितसिंग मेहता, हरपालसिंग यांचे चिरंजीव, बुद्धाजीनगर. 

नागपुरात प्रथमच या तंत्रज्ञानाने काम करीत आहे. घराची तीन फूट उंची वाढविण्यासाठी २२०  रुपये वर्ग फूट दर असून यापेक्षा जास्त उंची वाढविल्यास नंतरच्या प्रत्येक फुटासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येते. कुठलीही जोखीम नसून पूर्ण इमारतही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविण्याचे काम केले जाते. नागपुरात आणखी एक ऑर्डर मिळाली आहे. 
- विकासकुमार, पाटणा.

अशी आहे घर उचलण्याची पद्धत 
सर्वप्रथम मशीनने भिंती जमिनीपासून कापल्या जातात. त्यानंतर जॅक लावण्याची प्रक्रिया सुरू  होते. पिलरचीही कटिंग केली जाते. त्यानंतर एक लोखंडी अँगल जमिनीपासून वेगळ्या केलेल्या भिंतीखाली देऊन जॅकच्या साहाय्याने वर उचलल्या जाते. एका मजुराकडे १० जॅकची जबाबदारी असते. अशा १६ मजुरांकडे १६० जॅकची जबाबदारी आहे. दहा जॅकच्या एका गटातील प्रत्येक जॅकला वेगळा क्रमांक दिला आहे. आता येथे १६ गटातील एकाच क्रमांकाचे जॅक एकाचवेळी  वर उचलल्या जात असल्याने समांतर उंचीने घराची उंची वाढत असल्याचे विकासकुमार यांनी सांगितले. भिंतीला तडे जाऊ नये, यासाठी खिडक्‍यांच्या जागा विटांनी बुजविण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT