Jawar bajari biscuits in the Raj Bhavan
Jawar bajari biscuits in the Raj Bhavan 
विदर्भ

राजभवानात अकोल्यातील ज्वारी, बाजरीचे बिस्कीटे!

अनुप ताले

अकोला : महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने येथील शासकीय महिला औद्योगिक संस्थेच्या मदतीने ज्वारी, बाजरी पिकांपासून पौष्टीक अशी ११ प्रकारची बिस्कीटे व कुकीज तयार केली. नुकतेच त्यांचे राजभवनात सादरीकरण करण्यात आले असून, सकारात्मक अहवालाची प्रतीक्षा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या अधिकऱ्यांची बैठक घेऊन, राज्यातील मुख्य पीक ‘ज्वारी, बाजरी पिकांची व्हॅल्यू ॲडिशन करण्याचे व संशोधनातून नाविन्यपूर्ण बेकरी उत्पादने तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या टीमने अकोला शासकीय महिला औद्योगिक संस्थेच्या ‘बेकरी अँड कन्फेशनरी’ ट्रेडला १२ जानेवारी २०१९ ला भेट दिली व बेकरी उत्पादने निर्मितीसाठी सहाय्य घेतले. औद्योगिक संस्थेचे निदेशक, आजी व माजी प्रशिक्षणार्थीनी यांच्या मदतीने व कृषी विद्यापीठाच्या मागदर्शनात नाविन्यपूर्ण प्रयोग करून, ज्वारी, बाजरी, नाचणी, भादली व अन्य घटक वापरून (मैदा विरहीत) १५ प्रकारची बिस्किटे व कुकीज तयार करण्यात आली. कमी ग्लूटेन, जास्त फायबर, पचनास हलकी व पौष्टीक अशा बिस्किट व कुकीजची कृषी विद्यापीठाचे डॉ.प्रदीप बोरकर व त्याच्या टीमने पाहणी करून प्राथमिक निवड केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे अध्यक्षतेखालील उच्चस्तर तज्ज्ञ समितीने त्यांचेपैकी ११ प्रकारांची निवड केली. निवडलेले बिस्किट व कुकीजचे विद्यापीठाच्या वतीने राजभवनात सादरीकरण करण्यात आली असून, सकारात्मक अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा केली जात आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले, शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या टीमने शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळे, संस्थेच्या प्रशिक्षणार्थींना मोठे प्रोत्साहन मिळाले. या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे कृषी विद्यापीठ व आय. टी. आय. चे नाते घट्ट झाले असून, संस्थेतील ‘बेकरी अँड कन्फेकशनरी’ या ट्रेडला नवी ओळख मिळाली आहे.
- प्रमोद भंडारे, प्राचार्य, शासकीय महिला औद्योगिक संस्था अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT