Kishore Khatri murder case judgement in akola Life imprisonment for the accused
Kishore Khatri murder case judgement in akola Life imprisonment for the accused 
विदर्भ

अकोला : किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल; आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

सकाळवृत्तसेवा

अकोला : बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल गुरुवारी लागला. यातील मुख्य आरोपी रणजितसिह चुंगडे आणि पोलिस कर्मचारी जस्सी उर्फ जसवंतसिंह या दोघांना द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर दोघांची निर्दोष सुटका केली. 50 हजार दंडातील 40 हजार रक्कम नुकसान भरपाई म्हणून मृतकाच्या पत्नीला देण्याचे आदेश दिलेत.

जुने शहरातील सोमठाणा शेतशिवारात 3 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी बांधकाम व्यावसायिक किशोर खत्री यांचा खून झाला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक रियाज शेख व पोलिस उपनिरीक्षक संतोष केदासे यांनी दिलीप खत्री यांच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करून तपास केला. या तपासात पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, पोलिस कर्मचारी जसवंतसिंग उर्फ जस्सी, रुपेश चंदेल, राजीव मेहरे यांना अटक केली. या प्रकरणात रूपेश चंदेल व राजीव मेहरे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर रणजितसिंह चुंगडे व जस्सी यांचा जामीन अर्ज रद्द करून कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.

द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, जिल्हा सरकारी वकील ॲड. राजेश्‍वर देशपांडे यांनी 21 साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एेकूण घेतली आहे. या प्रकरणाच्या निकालात यातील मुख्य आरोपी रंजितसिह चुंगडे आणि पोलिस कर्मचारी जस्सी उर्फ जसवंतसिंह या दोघांना द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर रूपेश चंदेल व राजीव मेहरे यांची निर्दोष मुक्तता केली. तसेच 50 हजार रुपयांच्या दंडातील 40 हजार रक्कम नुकसान भरपाई म्हणून मृतकाच्या पत्नीला देण्याचे आदेश दिलेत. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व जिल्हा सरकारी वकील राजेश्वर देशपांडे यांनी बाजू मांडली.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईसाठी ऋतुराज-रहाणेकडून दमदार सुरुवात; पंजाबच्या गोलंदाजांचा विकेट्ससाठी संघर्ष

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT