file photo
file photo 
विदर्भ

यवतमाळात सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांनी आणि मार्गदर्शकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खेळांना जिवंत ठेवले आहे. आजही ते खेळाडूंना घडविण्याचे कार्य करीत आहेत. येथील खेळाडूंमध्ये चांगली प्रतिभा आहे. त्यामुळे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यासाठी येथील जिल्हा क्रीडासंकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण निधी आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीअंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल येथे तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण आणि विकासकामांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, क्रीडा व युवकसेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रतिभा देशमुख, सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, उपअभियंता प्रवीण कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्‍याम राठोड आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील क्रीडा संकुल आमदार असताना 1995 मध्ये बांधण्यात आले. आता काळानुरूप सर्वच बाबतीत बदल घडत आहे. क्रीडाक्षेत्रसुद्धा बदलले आहे. त्यामुळे खेळाडूंना अत्याधुनिक सुविधांपासून वंचित राहावे लागू नये म्हणून येथे 17 कोटींच्या कामांचे लोकार्पण आणि दहा कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. वर्षानुवर्षे प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक येथे आहेत. त्यांच्या हातून घडणारे खेळाडूंनी या सोयी-सुविधांचा लाभ घेऊन क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक करावा, असे आवाहन त्यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT