Laxity of Sangrampur Nagar Panchayat office superintendent in purchasing tiranga
Laxity of Sangrampur Nagar Panchayat office superintendent in purchasing tiranga 
विदर्भ

आता झेंड्यांच्‍या व्‍यवहारातही घालमेल; झेंडा न मिळाल्‍याचा नगसेवकांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर - आझादी का अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा खरेदीमध्ये संग्रामपूर नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक यांनी हलगर्जीपणा केल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवकांनी समोर आणला आहे. यामध्ये झेंड्याची गुणवत्ता नाही आणि जमा केलेल्या रकमेनुसार झेंडेही दिले नाहीत. असा आरोप करीत कोल्हे नामक कर्मचाऱ्यांमुळे संग्रामपूर मधील बहुतांश घरावर १३ ऑगस्‍ट रोजी तिरंगा फडकलाच नाही, याची चौकशी करण्याची मागणी ही नगराध्यक्षा सहित नगरसेवकांनी बोलण्यातून व्यक्त केली व तक्रार करणार असल्याचे सांगितले.

सत्ताधारी नगरसेवकांनी सांगितल्यानुसार संग्रामपूर शहरात घरोघरी तिरंग्‍यासाठी सर्व नगरसेवकांनी आपल्या मासिक भत्त्याची रक्कम जमा करून २८ हजार रुपये अधीक्षक शरद कोल्हे यांचेकडे दिले होते. सोबतच नगर पंचायत मधील कर्मचारी यांनी ही रक्कम गोळा करून त्यातून शहरासाठी झेंडे खरेदी करण्याचे ठरले. त्या नुसार १३ ऑगष्ट रोजी झेंडे मिळणे अपेक्षित होते. असे असताना अडीचशे ते तीनशेच झेंडे आमच्या पर्यंत पोहचले असल्याने यामध्ये साशंकता निर्माण झाली.

अधीक्षक म्हणतात, तीन हजार झेंडे आणले तर ज्यांनी झेंडे दिले त्‍यांचे म्‍हणने आहे की, पंधरा शे पाठवले होते. त्यातील साडे सहाशे खराब निघाले ते परत केले. यामध्ये नेमके किती झेंडे खरेदी झाले याची आकडेवारी जुळत नसून आलेले झेंडे गुणवत्तापूर्ण नसून छपाईमध्ये ही बऱ्याच चूका आहेत. कार्यालयीन अधीक्षक कोल्हे मात्र दोन दिवसांपासून( सुटीवर) कार्यालयात नसल्याने सर्व कारभार मोबाईल टू मोबाईल सुरू असल्याने यातील वास्तव सद्यातरी गुलदस्त्यात च म्हणावे लागेल! हा संताप व्यक्त करीत नगराध्यक्ष उषाबाई सोनोने,उपाध्यक्ष संतोष सावतकर, गट नेता शंकर पुरोहित,नगरसेवक वैभव गायकी, मोरखडे आदीनी घोषणा देत कार्यवाहीची मागणी केली आहे.

मासिक मिटिंगचा जो भत्ता होता तो सर्व पक्षीय सदस्यांनी हर घर तिरंगा याभियान व जनतेला झेंडा मोफतमध्ये देण्याच्या संकल्पनेसाठी २८००० रुपये कोल्हे नामक कर्मचाऱ्याला दिले होते. त्यांनी त्यामधून ३००० झेंडे घेण्याचे ठरविले असता,कोल्हे यांनी १५०० घेतले. तर ज्यांना ठेका दिला होता त्यांनी सांगितले की २००० घेतले. मात्र, याचे कुठेही टोटल जुडत नाही, न.प.ला १४०० झेेंडे आले होते त्यामधून ६०० खराब निघाले ते परत दिले. आमच्याकडे ८०० असल्यामुळे आम्ही,सर्व शाळा,अंगणवाडी, व इतर यांना ते वाटले. परंतू बाकीच्या गावातील नागरिकांना झेंडे मिळाले नसल्यामुळे संपूर्ण संग्रामपूर तिरंगा मय करण्याची आमची संकल्पना पूर्ण झाली नाही.

- वैभव गायकी, नगरसेवक न.प.संग्रामपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT