File photo
File photo 
विदर्भ

"एलसीबी'चा पोलिस निरीक्षक जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : गुन्ह्याचा तपास तकलादूपणे करून कमजोर चार्जशीट पाठविण्यासाठी 20 लाख रुपयांची तडजोड झाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने पाच लाखांची रक्कम घेतली. "एसीबी'च्या सापळ्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जाळ्यात अडकल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी (ता. पाच) दुपारी साडेबाराला दारव्हा मार्गावरील चिंतामणी पेट्रोलपंपाजवळ करण्यात आली.
मुकुंद काशिनाथ कुलकर्णी (वय 48, रा. यवतमाळ), सुनील विठ्ठल बोटरे (वय 38, रा. यवतमाळ), यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप प्रभाकर चव्हाण (वय 36) यांचेही नाव रेकॉर्डवर आले आहे. याबाबतची तक्रार 15 डिसेंबरला अमरावती येथील "एसीबी'कडे देण्यात आली होती. कळंब येथील "जय गुरुदेव' केमिकल्सवर छापा टाकून कीटकनाशक जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. सपोनि संदीप चव्हाण यांनी दाखल गुन्ह्याचा तकलादूपणे तपास करून कमजोर चार्जशीट पाठवितो. अधिक माल जप्त करीत नाही. तसेच भावाकडून घेतलेली शेतीची मूळ खरेदी, इसार पावती व धनादेश परत देण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली. 20 लाख रुपयांची तडजोड झाली. 27 डिसेंबरला पडताळणी करण्यात आली. त्यात पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी लाचेच्या रकमेपैकी दहा लाख संदीप चव्हाण यांनी स्वीकारल्याच्या समजुतीवरून 15 लाखांवरून 11 लाखांत तडजोड केली. पहिल्या टप्प्यातील पाच लाख आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत सुनील बोटरे यांच्याकडे देण्यास सांगितले. शनिवारी (ता. पाच) पीआय कुलकर्णी यांनी मागणी केलेली रक्कम सुनील बोटरे याने स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक पंजाब डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक गजानन पडघन, श्रीकृष्ण तालन, सुनील वऱ्हाडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, शैलेश कडू, चंद्रकांत जनबंधू यांनी केली.
18 डिसेंबरला सापळा फसला
"एसीबी'कडे तक्रार आल्यानंतर 18 डिसेंबरला सापळा रचण्यात आला होता. सपोनि संदीप चव्हाण हे पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणार होते. मात्र, त्यांना संशय आल्याने हा सापळा फसला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT