daroo.
daroo. 
विदर्भ

शहर गाढ झोपेत असताना चंद्रपुरात सुखरूप पोहोचले रॉकेट!

प्रमोद काकडे

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारूचा तुटवडा टाळेबंदीचा दीड महिना वगळता फारसा जाणवला नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर दारूतस्करीला पुन्हा सुरुवात झाली. आजवर दारूतस्कर वैयक्तिकरीत्या दारू आणायचे. मात्र काही दिवसांपूर्वी संघटितरीत्या दारू तस्करी करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित हॉटेलमध्ये तस्करांच्या बैठकांचे सत्र पार पडले. या बैठकीत तस्करीचा आराखडा तयार करण्यात आला. विभागवार माणसे नेमण्यात आली. पोलिस ठाण्यांचे "रेट' ठरले. दारूतस्करीचे अनधिकृत परवानेच वाटण्यात आले.

आणि अखेर शहर गाढ झोपेत असताना तळीरामांची तहान भागविण्यासाठी देशी दारूच्या (रॉकेट) जवळपास आठशे पेट्या बुधवारी मध्यरात्री चंद्रपुरात पोहोचल्याची माहिती आहे. या निमित्ताने संघटित दारूतस्करीच्या प्रयोगाला प्रारंभ झाला आहे. हा साठा आता तस्करांच्या "मोहल्ला कमिट्यां'पर्यंत पोहोचविला जाणार असून लवकरच तो तळीरामांच्या सेवेत पाठविला जाणार आहे.

दारूतस्करांच्या अक्षरशः: "मोहल्ला कमिट्या'च स्थापन करण्यात आल्या. मात्र या कमिट्यांमध्ये स्थान न मिळालेल्या काही असंतुष्टांनी याची वाच्यता केली आणि संघटित दारूतस्करीचे बिंग फुटले. गृहमंत्र्यांकडे यासंदर्भात अनेक तक्रारी केल्या. श्रमिक एल्गारच्या ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी यामागे राजकीय पाठबळ असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली.

त्यामुळे संघटित दारूतस्करीचा प्रयोग काही दिवस थंडबस्त्यात टाकण्यात आला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी दारूतस्करांविरोधात धाडसत्र सुरू केले. कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला. अनेक छोट्या तस्करांच्या मुसक्‍या आवळल्या. याकाळात संघटित दारूतस्करांची चर्चा थंडावली. हीच संधी साधून आता मोहल्ला "कमिट्या सक्रिय झाल्या. काल बुधवारला यवतमाळ येथून पहिली खेप त्यांच्यासाठी पाठविण्यात आली. अनेक पोलिस चौक्‍या आणि पोलिस ठाण्यांना वाकुल्या दाखवत देशी (रॉकेट) दारूच्या जवळपास आठशे पेट्या चंद्रपूर शहरात मध्यरात्री पोचल्या. रामनगर आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्या उतरविण्यात आल्या. रात्रीच संबंधित माणसांकडे साठा पाठविण्यात आला. दरम्यान शंभर पेट्या गस्तीवरील पोलिसांच्या हाती लागल्या. मात्र संघटित दारूतस्करीचा पहिला दिवस होता. याची जाणीव पोलिसांना तस्करांनी करून दिली. त्यामुळे तो साठा सोडला अशी माहिती याच क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
सविस्तर वाचा - दिग्गजांची विधान परिषदेची वारी चुकणार; कारण, कॉंग्रेसने घेतला हा निर्णय...
बाबुपेठ, रय्यतवारी, महाकाली परिसरातील गोलू वर्मा, एनडी, अमिता गुप्ता (सध्या फरार) यांच्यासह काही जणांकडे हा माल सुपूर्द केल्याची माहिती आहे. यवतमाळातील जयस्वाल आणि घुग्घुस येथील एक सरदार यांच्या देखरेखीत देशी दारूचा साठा चंद्रपुरात सुखरूप पोहचला आणि अशा तऱ्हेने संघटित दारूतस्करीचा श्रीगणेशा करण्यात आला.
संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT