file phote
file phote 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : 444 मतदान केंद्रांवर नजर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : संवेदनशीलसोबत कमी मतदान होत असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या मतदान केंद्राच्या हालचालींवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयासह निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. जिल्ह्यात 444 मतदान केंद्रांवरून वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष व उमेदवार प्रचाराला लागले आहेत. दुसरीकडे प्रशासनाची तयारी जोरात सुरू आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक तयारी करण्यात आली आहे. काही निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता संवेदनशील तसेच कमी मतदान होत असलेल्या केंद्रांची यादी तयार करण्यात आली आहे. या भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. येथे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होता कामा नये यासाठी वेब कास्टिंगच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून, 4,412 मतदान केंद्र निश्‍चित केले आहेत. यातील 444 मतदान केंद्रांवरील हालचालींवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. याचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. त्याचप्रमाणे याची लिंग निवडणूक आयोगाकडे असणार असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT