banana.jpeg
banana.jpeg 
विदर्भ

लॉकडाउन : केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; माल सडण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

पोरज (जि.बुलडाणा) : खर्चाच्या तुलनेत केळीला नाममात्र भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. केळी पिकाला एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च लागतो. एवढा खर्च लागूनही दरवर्षी एकरी 100 ते 150 क्विंटल मिळणारे उत्पन्न यावर्षी 70 ते 80 क्विंटलवर येऊन ठेपले आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यातच मागील तीन आठवड्यापासून कोरोना व्हायरसचे जगावर उद्भवलेल्या संकटामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन आहे. त्यामुळे केळीची कटनच रोखली आहे.

खामगाव तालुक्यातील पोरज, वर्णा, दिवठाणा, काळेगाव, निमकवळा या गावात गत दोन दशकापासून मोठ्या प्रमाणात केळीचे पीक घेतले जाते. यासाठी खान्देशात विकसित करण्यात आलेल्या नव्या जातीच्या बेण्याची लागवड केली जाते. यातूनच परिसरातील अनेक केळी उत्पादकांनी आता जी-9 हे टिश्‍युकल्चरच्या बेणे लावले आहे. 16 रुपयांत हे प्रत्येकी एक बेणे खरेदी केले जाते. परिसरातील 35 ते 40 शेतकऱ्यांनी यालाच पसंती दर्शवली.

जवळपास दोन लाख बेणे लावले आहे. या बेण्याच्या खर्चासाठी प्रत्येकी 32 रुपये बेणे प्रमाणे खर्च शेतकऱ्यांना वाहतूक लागवड करतानाच करावा लागतो. गारपीटमुळे अत्यंत उत्पन्न कमी व त्यालाही भाव नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांनी केळी जगवली. त्यात आता तिलाही 100 रुपये क्विंटल भाव मिळत आहे.

आवश्‍यक वाचा - बाळा मी लवकरच येईल...

माल न विकल्यास सडून जाण्याची भीती
मी अल्पभूधारक शेतकरी असून, अडीच एकरामध्ये केळी लागवड केली आहे. या व्यापाऱ्यांशी संपर्क केला असता लॉकडाउनचे कारण व्यापारी दाखवून 100 ते 150 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मागणी करत असल्याने व खर्चही निघत नाही. तर तीन ते चार दिवसांमध्ये माल न विकल्यास सडून जाण्याची तेवढीच भीती आहे.
- शिवाजीसिंह बोराडे, केळी उत्पादक शेतकरी, पोरज     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT