mahayuti meeting for navneet rana amit shah lok sabha election politics vote
mahayuti meeting for navneet rana amit shah lok sabha election politics vote Sakal
विदर्भ

Amravati : अमरावतीत हायव्होल्टेज शक्तिप्रर्दशन, रस्त्यांवर कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे; अनेक ठिकाणी वाहतूक वळविली

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : रणरणत्या उन्हात प्रचंड उत्साहात आपल्या नेत्यांच्या जयघोषाच्या घोषणा, झेंडे फडकवून प्रचंड जोशात निघालेली रॅली अन् आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करणारे कार्यकर्ते आज शहराच्या प्रत्येक रस्त्यावर दिसून आले.

एकीकडे अमरावती शहरात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सायन्सकोर मैदानावर आयोजित करण्यात आलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली भव्य रॅली, यामुळे शहर दुमदुमून गेले होते. दुसरीकडे परतवाडा येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा असल्याने जिल्ह्याचा ग्रामीण भागसुद्धा ढवळून निघाला होता.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक असताना प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी शहर व जिल्ह्यात राजकीय पक्षांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे वातावरण ढवळून निघाले होते.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदानावर आयोजित जाहीर सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,

मुकुल वासनिक, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार मुजफ्फर हुसैन, माजी मंत्री व आमदार अॅड. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, प्रीती बंड, सुनील खराटे, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रदीप राऊत, डॉ. हेमंत देशमुख, संगीता ठाकरे यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अचलपूर, परतवाडा, चांदूरबाजार, चिखलदरा, धारणीसह अन्य भागांतून नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, रवी राणा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्षात सभेला दुपारी तीन वाजता सुरवात झाली.

अमित शहा यांचे भाषण सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली. तर प्रहार पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात दिनेश बूब यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. नेहरू मैदानात जाहीर सभेने या रॅलीचा समारोप करण्यात आला.

कडक उन्हाची तमा न बाळगता शहरातील विविध भागांतून निघालेल्या या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे वाहतुकीच्या मार्गातसुद्धा बदल करण्यात आला. विशेष म्हणजे या पदयात्रेमध्ये प्रहारचे अनेक कायर्कर्ते ट्रॅक्टर ट्रॉलीसह सहभागी झाले होते.

पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण

एकाच दिवशी दोन राष्ट्रीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा तर दुसरीकडे शहरात निघालेल्या भव्य प्रचार पदयात्रांमुळे पोलिसांवर कमालीचा ताण निर्माण झाला होता. काल रात्रीपासूनच गृहमंत्री अमित शहा यांची सभा असलेल्या सायन्सकोर मैदानावर केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांसोबत स्थानिक पोलिसांना तैनात करण्यात आले होते.

परतवाडा येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेनिमित्त कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी दिवसभर पोलिस यंत्रणेवर चांगलाच ताण निर्माण झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT