Natya-Sammelan
Natya-Sammelan 
विदर्भ

नाटक हे माणसाच्या जगण्याचे प्रतिबिंब - वामन केंद्रे

सकाळवृत्तसेवा

नागपूर - ‘नाटक ही अडगळ नसून जीवन समृद्ध करणारी कला आहे, नाटक हे मानवी जगण्याचे प्रतिबिंब आहे,’’ असे प्रतिपादन नवी दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक वामन केंद्रे यांनी केले. ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील ‘नाटक : जगण्याची समृद्ध अडचण’ या परिसंवादात ते बोलत होते. 

‘‘गर्दी खेचणाऱ्या व्यावसायिक नाटकांपेक्षा जेव्हा हौशी नाटक मोठे होईल, तेव्हा नाटकाला चांगले दिवस येतील. मराठी माणसाने नाटकाला संकुचित केले आहे,’’ असेही मत वामन केंद्रे यांनी व्यक्‍त केले. परिसंवादाचे अध्यक्ष शफाअत खान होते. परिसंवादात अतुल पेठे, विभावरी देशपांडे आणि आशुतोष पोद्दार यांचाही सहभाग होता. कलेतून आलेले शहाणपण राज्यव्यवस्थेला धोक्‍याचे वाटते, म्हणूनच सेन्सॉर बोर्डाची कात्री व्यवस्थेला गरजेची वाटते. मात्र राजकीय आणि सामाजिक भान असलेले नाटक महत्त्वाचे आहे, असे मत अतुल पेठे यांनी व्यक्‍त केले. इतर कुठल्याही शास्त्राप्रमाणेच नाटक हेदेखील एक शास्त्र आणि कला आहे. त्याकडे चळवळ म्हणून बघू नये, नाटक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन नाटककार आशुतोष पोद्दार यांनी केले. सव्वा तास चाललेल्या या परिसंवादाच्या वेळी सुरेश भट सभागृह खच्चून भरलेले होते. परिसंवाद म्हटले की मोजके श्रोते, हे समीकरण नागपूरच्या श्रोत्यांनी चुकीचे ठरवल्याचे परिसंवादाचे अध्यक्ष शफाअत खान म्हणाले.

आज समारोप
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्य संमेलनाचे रविवारी (ता. २४) सूप वाजणार आहे. रेशीमबाग मैदानावरील (कै.) पुरुषोत्तम दारव्हेकर मुख्य रंगमंचावर सायंकाळी साडेसहाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT