Morna RIver
Morna RIver 
विदर्भ

मोर्णा स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग

विवेक मेतकर

अकाेला : जानेवारी महिन्याच्या १३ तारखेपासून लोकसहभागातून सुरू झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. माेहिमेत गुलजारपुऱ्यातील नागरिकांसह अकोलेकरांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यावेळी ‘जाणता राजा’चे कलाकार तसेच कुटे कोचिंग क्लासेसच्या संताेष कुटेंसह त्यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दगडी पुलाच्या जवळील गुलजारपुरा परिसरातील मोर्णेच्या काठावर स्वच्छता माेहीम राबविली.

अकोल्याचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाट्याने स्वच्छता होत आहे. स्वच्छता मिशनच्या  नवव्या टप्प्यात मोर्णा स्वच्छतेसाठी हजारो नागरिकांनी एकत्र येऊन मोर्णेची स्वच्छता केली. सकाळी ८ वाजतापासून दगडी पुला जवळील गुलजारपुरा परिसरातील मोर्णेच्या काठावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीद्वारे काढण्यात आलेली जलकुंभी तसेच प्लॅस्टिकचा कचरा नागरिकांनी नदीच्या काठावर जमा केला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता मोहीमेचा नववा टप्पा खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पाडला.

कलाकार व विद्यार्थ्यांनी काढली जलकुंभी
माेहिमेत ‘जाणता राजा’चे कलाकार तसेच जय गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश अभ्यंकरसह त्यांचे मित्र, संतोष कुटे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी, गुलजार पुऱ्यातील रहिवासी, पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मांसह त्यांच्या कुटुंबातील महिला व मुलांसह १६ सदस्य, महसूल व मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांसह नदीकाठच्या नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला.

पालमंत्री, महापाैर व इतरांनी केली स्वच्छता
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महापौर विजय अग्रवाल, माजी नगराध्यक्ष हरिश अलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार राजेश्वर हांडे, तहसिलदार रामेश्वर पुरी, नगरसेवक अजय रामटेके, नगरसेवक शशी चोपडे, नगरसेविका उषा विरक, नायब तहसिलदार राजेद्र इंगळे, मनपाचे कैलास पुंडे यांच्यासह विविध सामाजिक संस्था, महसूल व मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला.

डॉ. शर्मा यांनी केले जखमींवर उपचार
आयुवैदिक महाविद्यालयाचे तसेच गव्यंम सोशल वेलफेअर सोसायटीचे डॉ. कृष्णमुरारी शर्मा यांनी स्वच्छता मोहिमेत किरकोळ जखमी झालेल्या पाच व्यक्तींवर प्रथमोपचार करून त्यांना धर्नुवाताचे इंजेक्शन दिले. १३ जानेवारीपासून डॉ. शर्मा सतत मोहिमेत भाग घेत असून जखमींवर उपचार करत आहेत.

विविध संघटनांनी दिले याेगदान
मोहिमेत राष्ट्रीय चर्मकार संघ शाखा अकोला, भावसार महिला मंडळ जुने शहर, लघुव्यवसायी व्यापारी संघटना, सेवा फाउंडेशन, क्रीडा भारती, नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट, विदर्भ पटवारी संघटना, गव्यम सोशल वेलफेअर सोसायटी यांच्यासह व्यापारी, बचतगटांच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे येवून आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली स्वच्छता
निमाचे डॉ. मिलींद बडगुजर, डॉ. वर्षा बडगुजर, डॉ. गुप्ता, डॉ. चर्तुवेदी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या पत्नी निता खडसे, मुलगी साना, दिपाली बेलखेडे, सानिया मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या रिना धोटे, आयुवेर्दिक रूग्णालय अकोला, वेदाश्रय फिल्म्स, गुरुदेव मॉर्निग क्लब, निर्भय बनो जनांदोलनचे कार्यकर्ते, दिपशीला महिला वस्तीस्तर संघ, मनपाचे आरोग्य निरीक्षक, झोन अधिकारी, ओंकारेश्वर शिवभक्त मंडळाचे कार्यकर्ते, पराग गवई मित्र परिवार यांनी मोर्णा स्वच्छतेमध्ये सहभागी होवून श्रमदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT