विदर्भ

झुंडशाहीच्या राजकारणाविरोधात व्यापक लढाई लढायची आहे : अॅड. निशाताई शिऊरकर

सकाळवृत्तसेवा

चिमूर : दुर्बल , दुर्लक्षीत व सामान्य मानसांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न बाळगून मानव मुक्तीच्या चळवळीची वाट निवडून संघटना बांधली आहे.केंद्रापासून राज्यापर्यंत सरकार गरीब विरोधी असून झुंडशाहीचे राजकारण सुरू आहे. अशा झुंडशाहीच्या राजकारणाविरोधात मोठी व्यापक लढाई लढायाची असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्याध्यक्षा अॅड. निशाताई शिऊरकर यांनी हुतात्मा स्मारक चिमुर येथे आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात केले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व त्याकरीता त्यांच्याशी सुसंवाद साधून चळवळ आणि आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व विधानसभेवर मोर्चाच्या सहभागासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या चंद्रपूर जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन हुतात्मा स्मारक चिमूर येथे करण्यात आले. मेळाळ्याच्या अध्यक्षा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्याध्यक्ष अॅड .निशाताई शिऊरकर, प्रमुख मार्गदर्शक महासचिव कमलताई परूळेकर, कामगार नेते रूपचंद गद्रे, जयश्री काळे, चंद्रशेखर शुक्ला, किशणाताई भानारकर आणि जिल्हाध्यक्ष इमरान कुरेशी हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलताई बारसागडे यांनी केले .

 अॅड .निशाताई म्हणाल्या, की अश्रूचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा मोठे असते. त्यामुळे राज्य कार्याध्यक्ष दिवंगत इखलाख भाई कुरेशी यांनी या चळवळीकरीता दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल विधानभवनावर आयोजित मोर्चा हा इखलाखभाईच्या सार्वजनिक जीवनाला मोर्चा समर्पित आहे. मेळाव्याला उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यथोचित मार्गदर्शन करीत दिवंगत राज्य कार्याध्यक्ष इखलाखभाई कुरेशी यांचा वारसा विश्वासाने त्यांचे चिरंजिव इम्रान कुरेशी यांचेकडे देण्याचे ठरविण्यात आले. मेळाव्याचे संचालन माधुरी विर तर आभार प्रदर्शन आशाताई निमसटकर यांनी केले.

मेळाव्याला चिमूर, नागभीड, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, सिंदेवाही या तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी सभेच्या पदाधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT