Agriculture-Loss
Agriculture-Loss 
विदर्भ

१६ हजार हेक्‍टरमध्ये नुकसान

सकाळवृत्तसेवा

नागपूर - गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात २० हजार ३१८ शेतकऱ्यांच्या १६ हजार ३५१.६२ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. 

यात संत्रा, मोसंबी, केळी आदी फळे तसेच गहू, हरभरा व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनातर्फे बाधित क्षेत्रातील नुकसानाचे सर्वेक्षण केवळ चार दिवसांत पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्यात आल्याचेही कुर्वे यांनी सांगितले. जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान शेती व फळ पिकांचे नुकसान झाले.

या नुकसानासंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले. यात कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, पारशिवनी व रामटेक तालुक्‍यातील गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तर काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर व पारशिवनी आदी तालुक्‍यात संत्रा, मोसंबी, केळी व इतर पिकांची हानी झाली. 

बाधित शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानभरपाईसाठी २४ कोटी ८५ लाख रुपये निधी लागणार आहे. कोरडवाहू क्षेत्रातील १५९.६९ हेक्‍टर, सिंचित क्षेत्रातील ९ हजार ७५१.११ हेक्‍टर तसेच बहुवार्षिक पिकाखाली क्षेत्रातील ६ हजार ४३०.८२ हेक्‍टर अशा एकूण १६ हजार ३५१.६२ हेक्‍टर क्षेत्रांमध्ये पिकांचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT