Solar-Power-Project
Solar-Power-Project 
विदर्भ

उपराजधानीत तरंगता सौरऊर्जा प्रकल्प

सकाळवृत्तसेवा

नागपूर - मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स प्रदर्शनात विविध ऊर्जा कंपन्यांसोबत ऊर्जा विभागाने एक लाख ६० हजार २६८ कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. यात नागपूरमध्ये शंभर मेगावॉटचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून नागपूरमध्ये तब्बल एकवीसशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत. आज ऊर्जाविभागाशी संबंधित वेगवेगळे करार झाले. या करारामुळे २०२४ पर्यंत सुमारे ३० हजार तरुणांसाठी रोजगारनिर्मिती होईल, अशी आशा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. 

येथे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्‍यात ८०० मेगावॉट औष्णिक निर्मितीसाठी ५,२०० कोटी रुपये गुंतवणुकीकरिता सामंजस्य करार केला. महावितरणने विविध प्रकल्पांच्या विकासासाठी २०० मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती १,८०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. तर महापारेषणने वीज उपकेंद्रे, पारेषण वाहिन्या, देखभाल दुरुस्तीचे प्रकल्प म्हणून ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. नागपूर आणि मुंबईत गिरीराज रिनिवेबल प्रा. लि. तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार आहे. महानिर्मितीने पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, जुन्या ऊर्जानिर्मिती संचाची दुरुस्ती, कोळसा खाणी विकास आदींसाठी १३ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT