Accused Amol Kuthemate
Accused Amol Kuthemate Sakal
विदर्भ

एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला मारहाण; महिलेची प्रकृती चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा

एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय विवाहित महिलेला मारहाण झाल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे.

तिवसा /प्रशिक मकेश्वर - तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वऱ्हा येथे बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी 6 वाजताच्या सुमारास एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय विवाहित महिलेला मारहाण झाल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे येत असून या प्रकरणी कुऱ्हा पोलीसांकडून आरोपी विरुद्ध 307 गून्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

अमोल कुटेमाटे, वय 31, रा वऱ्हा. असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने काही वर्ष्यापूर्वी दोघांचे मैत्रीपूर्व प्रेम होते. मात्र, लग्नानंतर महिलेने अमोलशी संबंध तोडल्याने तो सतत तिला रस्त्यावर अडवून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.

दरम्यान, दि. 28 सप्टेंबर रोजी वऱ्हा ते धोत्रा मार्गे आपल्या मैत्रिणीसह नियमितपणे दुचाकीने कामावर जात असताना अमोलने तिचा रस्ता अडवून तिला फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. मैत्रीणीच्या बयानावरून कुऱ्हा पोलीसांनी आरोपी अमोल कुटेमाटे विरुद्ध 307 गुन्हा नोंदविला असून सध्या कुऱ्हा पोलीस आरोपीच्या मार्गावर आहे..

अमोल कुटेमाटे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर कुऱ्हा पोलीस ठाण्यात चोरी, मारहानी करून धमकावणे असे गुन्हे दाखल आहेत. तर या आधी सुद्धा कल्याणी घाटोळ हिला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर 307 गून्हा दाखल करण्यात आला होता. विविध गून्हा अंतर्गत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मागील वर्षी त्याला तिवसा न्यायालयात कुऱ्हा पोलीसांनी हजर केले असता, त्याने पोलीसांच्या तावडीतून पळ काढला होता. त्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT