The mayor of Sindi had to resign 
विदर्भ

सिंदीच्या नगराध्यक्षा पायउतार, कारण वाचून व्हाल अवाक्

मोहन सुरकार

सिंदी रेल्वे (जि. वर्धा) : येथील २०१६ च्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत एससी महिला राखीव पदासाठी झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून भाजपाच्या संगीता शेंडे विजयी झाल्या होत्या. निवडून आल्याच्या दिवसापासून निवडणूक प्रक्रियेनुसार 180 दिवसांत म्हणजे ७ मे २०१६ पर्यंत "शौचालय नियमित उपयोग प्रमाणपत्र" नगर परिषदला सादर करणे अनिवार्य होते. मात्र, विद्यमान नगराध्यक्षा संगीता शेंडे यांनी ते अद्याप सादर न केल्याबाबतची तक्रार नुकतीच पालिकेची नगरसेवकपदाची पोटनिवडणूक लढवलेले चंद्रशेखर बेलखोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दाखल घेत शुक्रवारी ( ता. १८)  जिल्हाधिकारी विवेक भीमनवर यांनी कारवाई करीत संगीता शेंडे यांना अपात्र घोषित केले. 

नगराध्यक्षा यांच्या विरुद्ध चंद्रशेखर बेलखोडे यांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार तक्रार दाखल केली होती.  सिंदीच्या नगराध्यक्षा यांची कारकीर्द मागील चार वर्षात वादग्रस्त राहली असून, याच काळामध्ये बजेटला मंजुरी न घेता कामे करून बिले काढणे, त्याप्रमाणे समित्यांची निवड रद्द करणे, गणपूर्ती अभावी सुध्दा सभा घेणे, यापूर्वी पेयजल योजनेच्या खाजगीकरणा वरून नगराध्यक्षा च्या विरोधात नगर परिषद वर गावातील जनतेने एकजूट दाखवून मोर्चा काढला होता.

त्यावेळी महिलांनी बाहेर येऊन नगराध्यक्षांनी निवेदन स्वीकारावे व खाजगीकरण थांबवावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली असता आपल्या हेकेखोरपणामुळे मोर्चातील लोकांची नाराजी झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. आदींमुळे कारकीर्द ऐतिहासिक ठरली आहे. नगराध्यक्षा उच्चशिक्षित व विभूषित असून शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यात त्यांनी कसूर केल्याने याच बाबीचा फायदा घेत चंद्रशेखर बेलखोडे याने नगराध्यक्षा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.  

तक्रारदार चंद्रशेखर बेलखोडे यांची बाजू अॅड. परीक्षित पेटकर यांनी तर  नगर परिषदेच्या वतीने अँड. राम देशपांडे यांनी मांडली. जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर जिल्हाधिकारी यांनी सिंदी च्या नगराध्यक्षांना अपात्र घोषित केले.  शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर न केल्याने नगराध्यक्षा अपात्र झाल्याबाबतचा महाराष्ट्रातील पहिलाच निकाल आहे.
 
संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT