संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

आदिवासी वाघांपुढे नरमला कोरोना !

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाने देश व राज्यभरात सर्वत्र थैमान घातलेले असतानासुद्धा आदिवासींचा बालेकिल्ला मेळघाट तसेच चांदूररेल्वे व तिवसा तालुका मात्र कोरोना संक्रमणाला अपवाद ठरला आहे. विशेष म्हणजे रोजगारासाठी अन्य जिल्ह्यांत गेलेले सर्वाधिक आदिवासी बांधव मेळघाटात परतलेले आहेत.


जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या उपचारासाठी 1 एप्रिलपासून जिल्हा कोविड रुग्णालय विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात स्थापन करण्यात आले. या रुग्णालयात पहिला रुग्ण म्हणून स्थानिक हाथीपुरा येथील 45 वर्षीय व्यक्तीची नोंद झाली. 2 एप्रिलला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 4 एप्रिलला त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 1 एप्रिल ते 30 जून या तीन महिन्यांत 569 व्यक्ती कोरोना संक्रमित आढळले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 55 व्यक्तींचा त्यात समावेश आहे. तालुकानिहाय संक्रमितांची संख्या अंजनगावसुर्जी 12, अचलपूर 10, चांदूरबाजार 8, मोर्शी 7, नांदगाव खंडेश्‍वर 5, भातकुली व वरुड प्रत्येकी 3, धामणगावरेल्वे, दर्यापूर प्रत्येकी 2 रुग्ण आढळले. अचलपूर तसेच धामणगाव येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यूदेखील झालेला आहे. मोझरी (ता.तिवसा) येथे विलगीकरणात असलेल्या एसआरपीएफच्या दोन जवानांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही.

आदिवासीबहुल धारणी, चिखलदरा तसेच चांदूररेल्वे आणि तिवसा तालुका कोरोना संक्रमणाला अपवाद ठरले आहेत. तिवसा 452, चांदूररेल्वे 1169, चिखलदरा 1571, तर धारणी तालुक्‍यात 2916 व्यक्ती कोरोना महामारीदरम्यान स्वगृही परतलेले आहेत. रोजगारासाठी परप्रांतात तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यात जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या चिखलदरा व धारणी तालुक्‍यातील होती. मेळघाटातील स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी घेतलेली कणखर भूमिकाच मेळघाटच्या कोरोनामुक्तसाठी कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. तिवसा तालुक्‍यातील राजकीय वाघीण, तर चांदूररेल्वे तालुक्‍यातील राजकीय वाघाच्या डरकाळीसमोर कोरोनाने नमते तर घेतले नाही ना?, असा सूर आता निघू लागला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT