file photo
file photo 
विदर्भ

मिहानमधील पतंजली प्रकल्पासमोर आर्थिक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूड पार्कची विकासकामे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या, उत्पादन सुरू करण्याच्या दृष्टीने मशीनही आयातही केली. मात्र, आर्थिक अडचण आणि तांत्रिक बाबीमध्ये प्रकल्प अडकला आहे.
पतंजलीने मिहान प्रकल्पात फूड पार्कसाठी 234 एकर जागा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. रामदेवबाबांच्या घोषणेनुसार 2017 च्या अखेरपर्यंत उत्पादन सुरू होणे अपेक्षित होते. त्यानंतर मार्च 2019 मध्ये फूडपार्कचा पहिला टप्पा सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र, सध्या निर्माण कार्य बंद पडल्याने मुहूर्त टळला. यामागे कंत्राटदाराला कामाचे पैसे न मिळाल्याने कामकाज बंद करण्यात आल्याची माहिती आहे. पतंजलीच्या फूड पार्कमधील अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल केले. काहींनी नोकरीला "जय महाराष्ट्र' केल्याचाही फटका निर्माणकार्याला बसला. सध्या येथे 20 ते 25 कर्मचारी कार्यरत असून, विकासकामे बंद असल्याने प्रकल्पाबद्दल शंका व्यक्‍त होत आहे.
पतंजली हा मिहानमधील आशियातील सर्वांत मोठा फूडपार्क म्हणून ओळखला जाणार आहे. अशा स्थितीत चार महिन्यांपासून विकासकार्य थंडावल्याने प्रकल्पाच्या पूर्णत्वाबद्दलही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. यासोबतच इंदोर येथील पतंजलीचा प्रकल्प आर्थिक अडचणीत असल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांसोबतचा करारही अडचणीत
एमएडीसीने पतंजलीला ही जागा फक्त एकरी 25.50 लाख रुपये दराने दिली. हा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. सरकारनेही आपली बाजू मांडताना नियमानुसार जागा दिल्याचे स्पष्ट केले होते. जमीन देताना त्यांनी सहा महिन्यांत बांधकाम सुरू करावे व 18 महिन्यांत प्रकल्पातून उत्पादन सुरू करावे, अशी अट घातली होती. ती अटही पाळण्यात आली नाही. तसेच नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत आवळा व कोरफड या दोन पिकांसाठी करार केला आहे. कंपनी या दोन्ही वस्तू खरेदी करणार आहे. मात्र, उत्पादनच सुरू न झाल्याने हा करारही अडचणीत आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT