समुद्रपूर : झाडातून स्राव होत असलेल्या पांढऱ्या द्रवाविषयी माहिती देताना अंनिसचे पदाधिकारी.
समुद्रपूर : झाडातून स्राव होत असलेल्या पांढऱ्या द्रवाविषयी माहिती देताना अंनिसचे पदाधिकारी. 
विदर्भ

कडुनिंबाच्या झाडातून दूधसदृश स्राव

सकाळ वृत्तसेवा

समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील साखरबाहुली येथील बाबा फरीद दर्गा परिसरात निंबाच्या झाडातून दूधसदृश द्रव वाहत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर त्या झाडाकडे बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. वेळीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी शास्त्रोक्त माहिती दिल्यावर नागरिकांकडून होणारा पूजापाठ थांबला.
हा प्रकार हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या साखरबाहुली येथील प्रसिद्ध दर्ग्यामागील परिसरात पोळ्याच्या दिवशी उघडकीस आला. मात्र, हा प्रकार विषाणूजन्य रोगांमुळे असल्याचे गावातील युवक प्रकाश टेंभुर्णे यांनी सांगितले. याचवेळी अखिल भारतीय अंनिसचे जिल्हा संघटक आकाश जयस्वाल, हिंगणघाट तालुका संघटक मनोज गायधने, मंगेश थूल, ललित डगवार, संजीव गवते यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना याविषयी माहिती दिली.
नागरिक पोळ्याच्या तयारीला लागले असताना साखरबाहुली येथील दर्गा परिसरात निंबाच्या झाडातून दूध वाहत असल्याचा प्रकार उघडकीस आली. हा प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी झाडाकडे धाव घेतली. अनेकांनी या झाडाची पूजा सुरू केली. मात्र, हा विषाणूजन्य प्रकार असल्याचे मत वनस्पती अभ्यासक मनोज गायधने यांनी व्यक्त केले. झाडाची साल काढताच हे दूध निघणे बंद झाले. झाडाला शेणाचा लेप लावून नागरिकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यात आली.

साखरबाहुली येथे कडुनिंबाच्या झाडातून पांढरा द्रव निघणे हा बॅक्‍टेरियामुळे झालेल्या इन्फेक्‍शनचा प्रकार आहे. या झाडातून डिंकसदृश द्रव किंवा झाडाच्या छिद्रात पावसाचे पाणी शिरले असावे. यातून हा बॅक्‍टेरिया बाहेर निघत आहे.
- मनोज गायधने,
वनस्पती अभ्यासक.

भाविकांनी याला दैवी चमत्काराचे रूप देऊ नये. यात भीती वाटून घेण्याचे कोणतेही कारण नाही. हा चमत्कार अथवा कोप आहे, अशी अफवा पसरवू नये. असे करणाऱ्यांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.
- प्रफुल्ल कुडे,
तालुका संघटक, अंनिस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT