A minor girl abducted in Akola, arrested by police
A minor girl abducted in Akola, arrested by police 
विदर्भ

अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे निर्देश दिले होते. त्यामुळे खडबडून जागी झालेल्या पोलिस यंत्रणेने तब्बल आठ महिन्यांनंतर कारवाई करून अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा पवन प्रमोद नगरे याला सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी अटक केली.


शहरात राहणाऱ्या एका पालकाच्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणात संबंधित पालकाने सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही. तसेच पोलिसांना आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलिस अधीक्षक, ठाणेदारांकडेसुद्धा सातत्याने तक्रार केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंटाळून पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती.

याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यांत अकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावला होता. त्यानंतरही पोलिस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत. एकंदरीतच प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकाने केला होता. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचा आदेश दिला. तसेच सिव्हिल लाइनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, महिला तपास अधिकारी पीएसआय कराळे यांनाही निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आणि शहरातील बेपत्ता मुलींच्या शोधकार्यास सुरुवात झाली. अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या पवन प्रमोद नगरे याला सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पवन नगरे यास २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT