mobile
mobile 
विदर्भ

मोबाईलने विचारक्षमतेवर विपरित परिणाम

शुभम बायस्कार

अकोला ः अतिरेकी स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांमध्ये मोबाईलचा वापर हा चॅटिंगसाठी सुरु आहे. देशभरात सुमारे 60 ते 70 टक्के तरुणाई या मायाजालाच्या फासात अलगद ओढल्या जात आहे. त्यामुळे मेंदूच्या विचारक्षमतेवर परिणाम होताना दिसून येत आहे. हिच परिस्थिती 20 वर्षांपर्यंत कायम राहिली तर मोठ्याप्रमाणात सामाजिक दरी निर्माण होईल. 

आप्तेष्ठांशी संपर्क तोडल्या जाईल. परिणामी ‘चिंताग्रस्त आयुष्य’ तुमच्या सुखी आणि समाधानी आयुष्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नसल्याचा दावा प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अमोल केळकर यांनी केला आहे, त्यामुळे वेळीच सावध होऊन चांगल्या सवयी जोपसण्याचा सल्लासुद्धा त्यांनी तरुणाईला दिला आहे.

आज प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलचा वापर केला जात आहे. लहानमुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांवरच आता मोबाईल आपले वर्चस्व गाजवित आहे. गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे, सोशल साईट्ससह विविध कारणांसाठी मोबाईलचा वापर केला जातो मात्र यामध्ये सर्वाधिक मोबाईलचा वापर सुमारे 8 ते 10 तास हा चॅटिंगसाठी सुरु असल्याचा निष्कर्ष मानसोपचारतज्ज्ञांकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण ही मोबाईलची भाषा बोलू लागला आहे. परिणामी आपल्या कामावर, नातेसंबधावर, वैवाहिक जीवनावर परिणाम होत आहे. त्याची अनेक उदाहरणे देखील समोर आली आहेत. विविध प्रकारचे मानसिक आजार सुद्धा आपल्याला बाळविण्याचा धोक असते. मोबाईलच्या अतिवापरासंदर्भातील हीच स्थिती जर 20 वर्षांपर्यंत कायम राहिली मानसिक आजार जडून सामाजिक दरी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. नातेवाईकांशी, समाजातील अन्य नागरिकांशी आपला संपर्क तुटेल. आणि आपल्या सुखी आयुष्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नसल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अमोल केळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

तर ही येईल वेळ!
मोबाईलचा अतिवापर हा विनाशाकडे नेणारा आहे. यामुळे 20 ते 22 वर्षातील तरुणाईला डिप्रेशन, चिंतारोग, ब्रेकअफ तथा रिलेशनशीपमध्ये खडके उडणे या समस्या निर्माण होतील. व्यसनाधीनता, मानाची स्थितरता संपून अस्थिरता येईल.‘व्यक्तिमत्व विकासा’ कडे सुद्धा दुर्लक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच मोठ्यामध्येही मानसिक आजार यातून बळावल्या जाऊ शकतात. त्यामुळे विनाशाकडे जाण्यापूर्वीच आपण सावध व्हायला हवे. मोबाईलचा अतिवापर टाळावा. ध्यान, व्यायाम, प्राणायम करणे सुरु करावे. परिवारातील सदस्यांसोबत मित्र मैत्रिणीसोबत निवांत गप्पा कराव्या. संगित सुद्धा ऐकावे असा सल्ला डॉ.केळकर यांनी दिला आहे.

मोबाईलचा सर्वांधिक वापर हा चॅटिंगसाठी होताना दिसत आहे. हीच स्थिती 20 वर्षांपर्यंत कायम राहली तर त्याचा विचारक्षमतेवर मोठा परिणाम होईल. ज्यामुळे ‘सुखी आयुष्यात’ अडचणी निर्माण होतील. त्यासाठी चांगल्या सवायी स्विकारून मोबाईलचा वापर हा फोन घेण्या आणि करण्यापुरताच करणे गरजेचे आहे.
-डॉ.अमोल केळकर, मानसोपचारतज्ज्ञ, अकोला 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT