Mobile-Child
Mobile-Child 
विदर्भ

मोबाईल हिरावतोय बालकांचा स्मार्टनेस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - चार वर्षांचा मुलगा केवळ मोबाईल मागतो, नाही दिला तर जेवण सोडतो. आठ वर्षाचं पोरगं बाबांच्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहतो.., दोन वर्षांच्या छकुलीला मोबाईल दिला की ती रडायची थांबते... अशा समस्या घेऊन पालक डॉक्‍टरकडे येत आहेत. अशा एक ना अनेक समस्या मुलांमध्ये मूळ धरत असल्याने, नव्या ॲप्सचा भरणा असलेले स्मार्टफोन नवीन पिढीतील खरा ‘स्मार्टनेस’ हिरावून घेत असल्याची भीती शहरातील बालरोगतज्ज्ञांसह, मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

‘ब्लू व्हेल’ या गेममुळे अनेक मुलांना जीव गमवावा लागल्यानंतर, आता ‘पबजी’ या गेमने मोबाईलग्रस्तांवर आघात सुरू केला आहे. लहान मुलांमध्ये या मोबाईलचे वेड वाढत असल्याने, ८० टक्के पालक मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घेत आहेत. आपल्या कामात अडथळा नको म्हणून यूट्यूब किंवा गेम लावून दिली की बाळ चुपचाप खेळतंय असा पालकांचा समज. मग कालांतराने बाळच फोन मागते. त्यासाठी हट्ट करते, गोंधळ घालते. तेव्हा स्व:तहून युट्यूब आणि गेम सुरू केला की पालकांना त्याचे कौतुक वाटते, पण आता पालकांना सावधतेचा इशारा दिला जातोय. 

जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या फोन आणि टीव्ही पाहण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांनी जास्त वेळ फोन वापरणे घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यावर जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

मुलांना मोबाईलमुळे समस्या होत आहेत हे पालकांना अद्याप कळत नाही. पालक मुलांच्या शारीरिक, मानसिक वाढीसंदर्भातील समस्या घेऊन येतात. परंतु, चर्चा केल्यानंतर ८० टक्के प्रकणांत समस्येचे मूळ मोबाईलवर अतिरिक्त वेळ घालवणे हेच असल्याचे दिसून येते.  
- डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ. 

पालक मुलांची प्रत्येक हौस पूर्ण करण्यावर ते भर देतात. परंतु, ते मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊन, त्यांचा नैसर्गिक स्मार्टनेस हिरावून घेत आहेत. मोबाईलमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. 
- डॉ. प्रवीण नवखरे, मानसोपचारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT