hacked
hacked 
विदर्भ

एनी डेस्क अॅप डाऊनलोड केल्यास होणार मोबाईल हॅक

सकाळवृत्तसेवा

अकोला : एनी डेस्क नावाचे अॅप्स डाऊनलोड केल्यास तुमचा मोबाईल हॅक होत आहे. तर ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या युपीआय कोडचा वापर करून तुमचे बॅंक अकाऊंट काही क्षणातच खाली केले जात आहे. तेव्हा हे टाळण्यासाठी एनी डेस्कसारखे अॅप डाऊनलोड करू नका असे अावाहन भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 14 फेब्रुवारीला एका पत्राद्वारे केले आहे.

मागील आठवड्यापासून शहरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर दिवसातून पाच-दहा वेळा या स्वरूपाचे मेसेज येत आहेत. एनी डेस्कसारखे अॅप डाऊनलोड केल्यास तुमचा मोबाईल हॅक करून तुमच्या खासगी गोष्टींवर पाळत ठेवली जाते. विशेष म्हणजे हा अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी ज्या टर्म कंडीशन विचारल्या जातात त्यामध्ये तुमचा पत्ता अाणि संपर्क क्रमांक गेल्यावर तुमचा मोबाईल सायबर गुन्हेगार हॅक करत अाहेत. तर अाॅनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असणारा युपीआय कोड वापरून तुमचे बॅंक खाते क्षणार्धात एम्पटी करून टाकले जात आहे. तेव्हा हा अॅप डाऊनलोड करू नका असे आवाहन सायबर विभागासह भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने केले जात आहे.

शहरातील अनेक नागरिक अशा मेसेजमुळे त्रस्त झाले असून हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच अशा फसवणुकीबाबत कोणाकडे तक्रार करायची, याबाबतदेखील नागरिकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काळजी घ्यावी
मेसेजला प्रतिसाद देण्याचे टाळा
मेसेजमधील लिंकवर क्‍लिक करू नका
मेसेजमधील अॅप डाऊनलोड करू नका
संबंधित मेसेज तत्काळ डिलीट करा
अशा स्वरूपाचा मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नका

अकोल्यात एकही तक्रार नाही
या अॅप्सच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची अद्याप एकही तक्रार अकोला सायबर पोलिसांकडे प्राप्त झाली नाही. असे जरी असले तरी या अॅप माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते म्हणून राष्ट्रीयकृत बॅंकांच्या वतीने अावाहनात्मक मॅसेज पाठवून जनजागृती केली जात अाहे.

कोणताही अॅप खात्री करूनच डाऊनलोड करावा, अापली अार्थिक फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर विभागाशी संपर्क साधावा. अाॅनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगणे गरजेचे अाहे.
- सीमा. म. दाताळकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT