Storm-Loss
Storm-Loss 
विदर्भ

मॉन्सूनपूर्व वादळाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा

आसोला, केम येथे घरांवरची छपरे उडाली; विजेचे खांब पडले, झाडे कोसळली
बुटीबोरी / कामठी / भिवापूर - मॉन्सूनपूर्व पावसाने कामठी व हिंगणा तालुक्‍यातील काही गावांना सोमवारी जोरदार फटका बसला. एका मेंढपाळासह दोघांचा मृत्यू झाला. कामठी तालुक्‍यातील केम या गावात वादळामुळे नुकसान झाले. तर हिंगणा तालुक्‍यातील आसोला या गावात अनेक घरांवरील छपरे उडून नुकसान झाले. वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली तर सुमारे ५० विजेचे खांब वाकल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

हिंगणा तालुक्‍यातील आसोला येथे सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अचानक वादळी पावसाचे आगमन झाले. आसोला  गावातील सुमारे पंचवीस ते तीस घरांवरचे टिनपत्र्यांचे छप्पर उडले. अनेक घरांवरचे कवेलू खाली पडले. काही घरे या वादळामुळे उद्‌ध्वस्त झालीत. सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्याचा मारा इतका जोरदार होता की घराजवळ असलेली अनेक झाडे कोसळून पडली. तर घराजवळ असलेले इलेक्‍ट्रिकचे जवळपास दहा ते बारा खांबसुद्धा वाकले. यामुळे काही काळ गावात भीतीचे वातावरण पसरले होते. वृत्त लिहिस्तोवर आसोला येथील वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने गाव अंधारात होते. 

वादळी पावसामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आसोल्याच्या आसपासच्या गावांतही वादळाने काल जनजीवन विस्कळीत झाले होते. 

कामठी तालुक्‍यातील केम व आसपासच्या परिसरात दुपारी तीन वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळामुळे चांगलाच फटका बसला. गावातील तसेच शेतातील सुमारे २३ विजेचे खांब वाकले. यामुळे वीजपुरवठा बंद झाला होता. तसेच सुसाट वादळवाऱ्याने कित्येक झाडे पडली. काही पक्ष्यांचाही मृत्यू झाला. गावातील कित्येक ग्रामस्थांच्या घरांवरील टिनाचे छत, घरावरील कवेलू तसेच टिनाचे शेड उडाले. वादळाने परिस्थिती विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. उपसरपंच अतुल बाळबुधे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली.

दोघांचा मृत्यू
कामठी - पावसाळ्यापूर्वी रोहिणी नक्षत्रात आलेल्या वादळी पावसात वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू झाला. ही घटना कामठी तालुक्‍यातील अडका गावात सोमवारी घडली. मधुकर गहाणे (वय ५५, रा. हिंगणा) असे मृताचे नाव आहे.

भिवापूर, उमरेड व कुही तालुक्‍दुपारी चारच्या सुमारास वादळवाऱ्याने थैमान घातले. टिनाचे शेड कोसळून एक जण ठार तर एकाच्या अंगावर आंब्याच्या झाडाची फांदी कोसळून एक जखमी झाला. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास कामठी तालुक्‍यातील आडका शिवारात सुमारे अर्धा तास वादळी वारा तसेच विजांचा कडकडाट सुरू झाला. ग्रामपंचायत सदस्य स्वाती सुभाष खेडकर यांच्या शेतात हिंगणा येथील मधुकर गहाणे या मेंढपाळावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती होताच आडकाच्या सरपंच भावना चांभारे, प्रा. अवंतिका लेकुरवाळे, केमचे उपसरपंच अतुल बाळबुधे, विजय खोडके, निरंजन खोडके, विष्णू नागमोते आदींनी मदतीसाठी धाव घेतली. तहसीलदार अरविंदकुमार हिंगे यांना घटनेची माहिती देत नुकसानग्रस्तांसाठी निधीची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT