Crim News esakal
विदर्भ

Motala Crime : अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अडीच वर्षीय चिमुकलीवर एका सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपीने अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

मोताळा - अडीच वर्षीय चिमुकलीवर एका सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपीने अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना नांदुरा तालुक्यातील एका गावात गुरुवारी (ता.२३) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी शुक्रवारी (ता.२४) गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदुरा तालुक्यातील एका गावात अडीच वर्षीय चिमुकली गुरुवारी (ता.२३) दुपारी घरासमोरील गल्लीत खेळत होती. तिची आजी समोर बसलेली होती. यावेळी आरोपी अल्पवयीन युवक तिथे आला. त्याने खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुकलीला बोट धरून एका पडक्या घरात नेले व तिच्यावर अत्याचार केला.

यात चिमुकली गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. तिला मरणासन्न अवस्थेत सोडून आरोपीने तेथून पळ काढला. दरम्यान, बराच वेळ होऊनही चिमुकली घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्या आरोपीला विचारपूस केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

दुपारी साडेचारच्या सुमारास त्या पडक्या घरातून चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला. तेथे पीडित चिमुकली रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे ठाणेदार बळिराम गीते यांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, बुलडाण्याचे एसडीपीओ गुलाबराव वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

आरोपी बालसुधारगृहात

पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचे वय १७ वर्ष पाच महिने असल्याची माहिती आहे. आज (ता.२४) त्याची बुलडाणा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपीच्या वडिलांचे गावात दुकान असून, त्यांच्यावर अवैध दारूविक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT