सपना, अनघा
सपना, अनघा 
विदर्भ

लेकराला बघताच गहिवरली "माय'

सकाळवृत्तसेवा

नागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात ओळखीचा असो वा अनोळखी, अशा साऱ्या मनोरुग्णांवर उपचार होतात. उपचारादरम्यान मनोरुग्णांना बोलतं करणं, समुपदेशनातून कुटुंबाची माहिती काढून घेण्याचं काम येथील सामाजिक कार्यकर्ते करतात. नुकतेच सहा वर्षे मनोरुग्णालयात उपचार घेत असताना अचानक महिलेने "ढाका' असे नाव उच्चारले आणि मनोरुग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्यांनी बांग्लादेशातील त्या मनोरुग्ण महिलेच्या घराचा पत्ता शोधला. त्याच्या कुटुंबीयांना बोलावले. लेकराला बघून ती माय ढसाढसा रडली. आईला बघताच मुलगा पाया पडला. लेकराच्या पाठीवरून मातेने हात फिरवला. मनोरुग्णालयातील हा निरोप सोहळा बघून सारे मनोरुग्णालय गहिवरले. सात वर्षे मनोरुग्णालयात आयुष्य जगणाऱ्या "सपना' (मनोरुग्णालयाने दिलेले नाव)च्या साता समुद्रापलीकडे असलेल्या कुटुंबांची भेट घडवली.
सपना बांग्लादेशातील "बेशूर हाट'मधील कपानीगंज येथील. 2013 ची घटना. कपानीगंज येथील घरी मुलीच्या लग्नाचा आनंद सोहळा रंगला होता. मुलीच्या लग्नापूर्वी सपना (खरे नाव आलिया) यांना मानसिक आजारावर औषधोपचार सुरू होते. मुलीच्या लग्नाच्या आनंदात घरून निघून गेली. नागपुरात कधी, कशी पोहोचली हे कळलेच नाही. नागपुरातून कुही तालुक्‍यात डांबरी रस्त्यावर दिवस काढत होती. पोलिसांनी मेडिकलमध्ये भरती केले. मेडिकलमधून न्यायालयाच्या मध्यस्थीने मनोरुग्णालयात आणले. मनोरुग्णालयात तिला सपना हे नाव दिले. 2013 सालापासून तिच्यावर उपचार सुरू होते. मनोरुग्णालयाने केलेल्या योग्य उपचारातून काही प्रमाणात तिला समज आली. ओळख पटू लागली. दोन महिन्यांपूर्वी एक दिवस "ढाका' असा शब्द उच्चारला आणि येथील मनोरुग्णालयातील सामाजिक अधीक्षक अनघा मोहरील (राजे) यांनी तिला हळूहळू बोलते केले. बांग्लादेशातील कपानीगंज असे तोकडे नाव घेतले आणि नेटवरून सर्व माहिती काढून घेतली. यानंतर बांग्लादेशातील पोलिसांच्या मदतीने कपानीगंज येथील पोलिसांसोबत संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी कपानीगंज येथील सपना ऊर्फ आलियाच्या कुटुबांचा पत्ता शोधला. परिवाराशी भेट घडवून देण्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात, डॉ. प्रवीण नवखरे, डॉ. अभिषेक मामर्डे, डॉ. पंकज बागडे, डॉ. आशीष कुथे, सामाजिक कार्यकर्ता केवल शेंडे यांचे मोलाचे योगदान आहे.
मनोरुग्णालयातून "व्हिडिओ कॉल'
महिनाभरापूर्वी मानसिक विकारातून बाहेर आलेल्या सपना ऊर्फ आलियाचा संवाद बांग्लादेशात असलेल्या तिच्या कुटुंबाशी घडवून आणला. मनोरुग्णालयातील सामाजिक अधीक्षक अनघा मोहरील यांनी आपली सामाजिक जबाबदारी सांभाळत संवादातून पोलिस आणि महिलेच्या कुटुंबाशी संवाद साधला. त्यानुसार, शुक्रवारी राजू अबुल हसन हा आलियाचा मुलगा आला. दुपारी आपल्या आईला घेऊन तो घरी जात असताना उपस्थित साऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.

इतर आजारांप्रमाणे मानसिक विकार आहे. हा आजारही बरा होतो. इतरांप्रमाणेच सामान्य जीवन ते जगू शकतात. नातेवाइकांनी मनोरुग्ण आहे, हे विसरून जावे. आतापर्यंत देशभरातील 20 च्यावर मनोरुग्णांचे पुनर्वसन केले आहे. आता विदेशातील बऱ्या झालेल्या महिलेला तिच्या कुटुंबीयांशी भेट घडवण्यात सामाजिक कार्यकर्ता, डॉक्‍टर यांचा मोलाचा वाटा आहे.
-अनघा मोहरील, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT