Murder
Murder 
विदर्भ

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या पतीचा खून

सकाळवृत्तसेवा

तुमसर (जि. भंडारा) - तालुक्‍यातील येरली येथील विनोद सुखदास कुंभरे (वय २५) या युवकाची मांडवाच्या दिवशी सोमवारी (ता. सहा) धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी विनोदची होणारी पत्नी रिना बाबूराव मडावी (वय २३) व तिचा प्रियकर प्रफुल्ल कृष्णराव परतेती (वय २६) दोन्ही राहणार कोयलारी यांना अटक केली आहे. रिनाच्या प्रियकराने कट रचून विनोदचा खून केल्याची बाब पोलिस तपासांत समोर आली आहे.    

बुधवारी रात्री या दोघांना अटक करण्यात आली असून, या घटनेत आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे. दोन्ही आरोपींना गुरुवारी तुमसर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १३ मेपर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

येरली येथील विनोद कुंभरे याचे लग्न कोयलारी येथील रिना मडावी हिच्याशी ७ मे रोजी होणार होते. परंतु, तिचे प्रेमप्रकरण प्रफुल्ल परतेती याच्याशी सुरू असल्याने ती लग्नाला तयार नव्हती. इच्छेविरुद्ध होणारे हे लग्न होऊ नये यासाठी प्रियकराच्या मदतीने भावी पतीच्या खुनाचा कट रचण्यात आला. खुनाची घटना उघडकीस येताच तुमसर पोलिसांनी लोकचर्चा व  प्राथमिक माहितीच्या आधारे कसून चौकशी केली. यातून विनोदच्या हत्येचे रहस्य उलगडले. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोषसिंग बिसेन, पोलिस निरीक्षक मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. स्मिता वासनिक, पो. ना. खराबे, पो. शि. वैरागडे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT