Nagpur-Metro
Nagpur-Metro 
विदर्भ

मेट्रोचे लोकार्पण आज

सकाळवृत्तसेवा

नागपूर - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागण्याची शक्‍यता असल्याने नागपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या माझी मेट्रोचे लोकार्पण गुरुवारी  (ता. ७) होणार आहे. वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साउथ स्टेशनवर सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मेट्रोचे लोकार्पण होईल. 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माझी मेट्रोला हिरवी झेंडी दाखवतील तर मुख्यमंत्री फडणवीस,  केंद्रीयमंत्री गडकरी, केंद्रीयमंत्री हरदीपसिंग पुरी एअरपोर्ट साउथ स्टेशनवर मेट्रोला हिरवी झेंडी दाखवतील. खापरी ते एअरपोर्ट साउथपर्यंत ही मेट्रो धावणार असून, शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून मेट्रोच्या प्रवासी सेवेला प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी मेट्रो प्रशासन आभारदिन साजरा करणार असून, या दिवशी नागपूरकरांना मोफत प्रवास करता येईल. शुक्रवारपासून मेट्रो ट्रेन खापरी ते सीताबर्डीपर्यंत धावणार आहे. शनिवारपासून तिकिटावरील प्रवासाला सुरुवात होईल. सकाळी दोन व सायंकाळी दोन फेऱ्या होतील. याशिवाय लोकार्पणापूर्वी ‘माझी मेट्रो डिम्स कम्स ट्रू’ या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. प्रदर्शन सात दिवस नागरिकांना सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत नागरिकांसाठी खुले राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT