विदर्भ

फेसबुकवरील मैत्रीनंतर अत्याचार

सकाळवृत्तसेवा

नागपूर - फेसबुकवर ओळख झाली. फेसबुकवरच मैत्री फुलली आणि प्रेमही बहरले. पहिल्याच भेटीत लग्नाचे आमिष देऊन युवकाने तिच्यावर अत्याचार केला. सुमारे दहा महिने प्रेमाचे संबंध राहिल्यानंतर मुलाने लग्नाला विरोध केला. यामुळे मुलीने पोलिस ठाणे गाठून कैफियत मांडली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

शिवराज हाडे (२८, रा. गडचिरोली) असे आरोपीचे नाव असून पीडित युवती मूळची नांदेडची रहिवासी असून सध्या चंद्रमणीनगरात वास्तव्यास आहे. दोघांचीही फेसबुकवर ओळख झाली. फेसबुकवर तासन्‌तास गप्पा रंगायच्या त्यातच दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला. ठरल्यानुसार, ३० डिसेंबर २०१६ रोजी सीताबर्डीतील हल्दीरामसमोर दोघेही प्रथमच समोरासमोर भेटले. त्यानंतर चर्चेसाठी एका लॉजमध्ये थांबले. ३० ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत हे प्रेमसंबंध कायम होते. नंतर मात्र आरोपीने तिला टाळणे सुरू केल्याने मुलीने गडचिरोली गाठत त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. त्याने नकार दिल्याने तिने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पहिली भेट सीताबर्डीत झाल्याने प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT