विदर्भ

जान जाए पर मोबाईल न जाए!

अनिल कांबळे

नागपूर - पत्नी, मुले दुचाकीवर आणि मोबाईल कानाला असे दृश्‍य अनेकदा आपण रस्त्यावरून जाताना पाहतो. त्यात अनेकदा नाहक बळी गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यावरून जीव गेला तरी चालेल; पण मोबाईल सोडणार नाही, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. 

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी कायम रेडिओ अथवा एफएमवरील जाहिरातीतून मोबाईल कानाला लावून दुचाकी चालवू नये, अशी जनजागृती करीत असतात. त्याकडे दुर्लक्ष करीत शहरात कानाला मोबाईल लावून दुचाकी चालविणाऱ्यांच्या आकडेवारीचा आलेख चढता आहे. अनेकांच्या हे जीवावरही बेतले. तरीही शहरातील वाहनचालक ‘पॅशन’ म्हणून मोबाईल कानाला लावून वाहन चालविताना दिसतात. जीव गेला तरी चालेल; पण मोबाईल सोडणार नाही, अशीच स्थिती वाहनचालकांची आहे. वाहतूक पोलिसांनी वर्षभरात ७ हजार ५०० वाहनचालकांवर मोबाईल वापरल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. 

मात्र, या कारवाईमुळे वाहनचालकांवर वचक पुरेसा नसल्यामुळे उघड झाले आहे. शहरात वाहतूक पोलिसांचे कितीही नियंत्रण असले तरी अनेक जण ‘कुछ नहीं होता’ असे म्हणत कार किंवा दुचाकी चालविताना मोबाईल वापरतात. 

अनेक वेळा चौकात उभा असलेला वाहतूक पोलिस कर्मचारीसुद्धा दुर्लक्ष करतात. वाहतूक पोलिस तुरळक कारवाई करतात, असा समज निर्माण झाल्यामुळे आज दहामधील सहा जण मोबाईल कानाला लावून वाहन चालवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः महाविद्यालयीन युवतींमध्ये मोबाईल कानाला लावून दुचाकी चालविण्याचे ‘फॅड’ जास्त आहे. ‘इअर फोन’ कानात लावून दुचाकी चालविणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळेच अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे.

अतिआत्मविश्‍वास नडतो
काही युवक बाइकवर स्टंटबाजी करीत मस्ती करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, स्टंटबाजीतून अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कारमध्ये मोबाईल स्पीकर मोडवर टाकून चालक बिनधास्तपणे मोबाईलवर बोलताना आढळतात. तर काही जण हेल्मेटमध्ये मोबाईल अडकवून बोलताना दिसतात. तर काही जण व्हॉट्‌सॲपवर संदेश वाचतात. त्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात घडतो.

२३२ जणांचा गेला जीव
रस्ते अपघातात २०१७ मध्ये २३२ जणांचा जीव गेला. अपघातांमध्ये युवकांची संख्या जास्त आहे. २०१६ मध्ये ३१० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. वाहतूक विभागाने अपघातांवर थोडेफार नियंत्रण मिळवले आहे. वर्ष २०१७ मध्ये ७ हजार ५०० वाहनचालकांवर कारवाई केली, तर २०१६ मध्ये ६ हजार २९४ वाहनचालकांवर कारवाई केली. जवळपास १५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT