विदर्भ

नागपूर आशियातील मोठे लॉजिस्टिक हब होईल - नितीन गडकरी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) नागपूरचे लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्व वाढले आहे. भविष्यात आशियातील सर्वांत मोठे लॉजिस्टिक हब म्हणून नागपूर नावारूपास येईल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राज्य ऊर्जा अभिकरण व नागपूर फस्ट चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ग्लोबल नागपूर समिट २०१७ च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष नीरज बंसल, महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरणाचे अतिरिक्त महानिरीक्षक पुरुषोत्तम जाधव, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. गडकरी पुढे म्हणाले, नागपुरात जन्म झाल्यानंतर विदेशात स्थायिक झालेले नागरिक नागपूरच्या विकासाचा विचार करतात, ही आनंदाची बाब आहे. देशातील व्यावसायिक वातावरण बदलत असल्याने तेथील गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन केले. मिहानमध्ये पतंजली ६०० एकरामध्ये प्रकल्प सुरू करीत असून, काम लवकरच सुरू होईल. याशिवाय शहरात होत असलेल्या विविध विकास कामावर नितीन गडकरी यांनी प्रकाश टाकला. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील सुमारे ४० लाख कृषिपंपांना सध्या पारंपरिक वीजवाहिन्यांच्या साहाय्याने ३ हजार  ५०० मेगावॉटचा वीजपुरवठा केला जातो. या सर्व पंपांना सौर ऊर्जेवर आणायचे असून, सर्व शाळांनाही सौर ऊर्जेवर आणायचे आहे. सोबतच राज्यातील ४० हजार ग्रामपंचायतींमार्फत राबविल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजनाही सौर ऊर्जेवर आणायच्या आहेत. राज्यातील तीन मोठ्या धरणांसोबत सर्व लहान मोठ्या तलावांवर सौर ऊर्जा निर्मिती करण्याची योजना आहे. शासकीय कार्यालयांनाही सौर ऊर्जेवर आणायचे असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT