विदर्भ

कीटकनाशकाने नव्हे, तंबाखू सेवनाने मृत्यू!

विनोद इंगोले

नागपूर - विदर्भातील शेतकऱ्यांचा मृत्यू कीटकनाशकाने नव्हे तर तंबाखू खाण्यामुळे झाल्याचा जावईशोध कीटकनाशक कंपनीचे प्रतिनिधी एस. पी. राणे यांनी लावला. कीटकनाशक आणि तंबाखू एकमेकांच्या संपर्कात आल्यास त्याचे घातक परिणाम शरीरावर होतात, अशी  पुश्‍तीही त्यांनी जोडली. एवढेच नव्हे तर प्रामुख्याने पूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी व शेतमजूर तंबाखूचे सेवन करतात, असा दावा करून खर्रा आणि तंबाखूवर बंदी घालण्याची शिफारसही त्यांनी केली. 

यवतमाळपाठोपाठ संपूर्ण विदर्भात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २६ शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला. याची कारणे शोधण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात विषबाधाप्रकरणी तज्ज्ञ समितीची सभा घेण्यात आली. प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सभेला कृषी विकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक,  कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ राम गावंडे यांच्यासह समितीमधील दहा सदस्यांचा समावेश होता. कीटकनाशक कंपनीचे प्रतिनिधी म्हणून एस. पी. राणेसुद्धा उपस्थित होते. 

बैठकीच्या शेवटी कंपनी प्रतिनिधी एस. पी. राणे यांनी भूमिका मांडली. कीटकनाशक आणि खत एकत्र करून फवारण्याची कुठल्याही कंपनीने शिफारस केलेली नाही. मात्र, काही शेतकरी याकडे दुर्लक्ष करून एकत्रित फवारणी करतात. त्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात. या बैठकीचे इतिवृत्त नुकतेच समोर आले. त्यात राणे यांनी कीटकनाशकांना तंबाखूची साथ मिळाल्याने  फवारणी करणाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 

आधी दारू आता तंबाखू 
क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजू श्राम यांनी वैद्यकीय अहवालांचा हवाला देत मृत्यू दारू आणि आजारपणामुळे झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी तंबाखूवर बोट ठेवत आहेत. तंबाखू खाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने नागपूर विभाग कॅन्सर हब झाला असल्याचा दावाही राणे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT