एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणारे शंभरावर विद्यार्थी एकाच ठिकाणी गोळा झाले.
एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणारे शंभरावर विद्यार्थी एकाच ठिकाणी गोळा झाले. 
विदर्भ

एमबीबीएसचे विद्यार्थी म्हणाले : रॅगिंग नाही, सिनियर भाऊ लोकं मार्गदर्शन करणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोरचा परिसर. शंभरापेक्षा अधिक विद्यार्थी एकाच ठिकाणी गोळा झाले. येता-जाता सारे वैद्यकीय शिक्षक विचारत होते, काय झाले? साऱ्या मुलांचे एकच उत्तर सिनियर भाऊ लोकं मार्गदर्शन करणार आहेत. अधिष्ठाता कार्यालयासमोर कोणते मार्गदर्शन करणार हे विचारताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सारे तोंडावर बोट हाताची घडी करून हळूच निघून गेले.
एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणारे शंभरावर विद्यार्थी एकाच ठिकाणी गोळा झाले. साऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगवेगळे. अधिष्ठाता कार्यालयासमोर का? निवेदन देणार का? अशी विचारणा करताच सारे विद्यार्थी भांबावले. डिसेंबरमध्ये परीक्षा असल्यामुळे एमबीबीएसचे वरिष्ठ भाऊ लोकं मार्गदर्शन करणार आहेत. सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक मार्गदर्शन करायचे सोडून वरिष्ठ विद्यार्थी कोणत्या आधारे मार्गदर्शन करणार असा सवाल करताच विद्यार्थ्यांनी पाय काढता घेतला.

हळूहळू सारेच गूल
दहा मिनिटं येथेच थांबल्यानंतर मात्र एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे एकत्र जमलेले सारे विद्यार्थी हळूहळू येथून वसतिगृहाच्या दिशेने चालू लागले. भाऊ लोकं येणार नाही, असे सांगत सारेच विद्यार्थी पंधरा मिनिटांनंतर गूल झाल्याचे दिसून आले. यासंदर्भात प्रशासनाला विचारणा केली असता, त्यांनीही रॅगिंग नसल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT