नागपूर : घराशेजारी राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीवर 17 वर्षे वयोगटातील दोन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले. कुणालाही सांगितल्यास मुलांनी जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, आईने आस्थेने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातमजुरी करणारे दाम्पत्य कोराडीतील ओंकारनगरात राहतात. त्यांना 11 वर्षीय मुलगी आहे. त्यांच्याच वस्तीत आरोपी दोन्ही मुले राहतात. त्या मुलांचेही आईवडील हातमजूर असून मुलीच्या आईसोबत कामावर जातात. त्यामुळे त्यांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध होते. मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दोन्ही मुले तिला घरी नेऊन अश्लील चाळे करीत होते. 28 जून रोजी घरी कुणी नसताना मुलीला दुपारी शाळा सुटल्यानंतर दोन्ही आरोपींनी घरी बोलावले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटोही काढले. कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. गेल्या काही दिवसांपासून ती मुले घरी आल्यानंतर मुलगी घरात लपत होती, ही बाब तिच्या आईला खटकली. मुलीसोबत काहीतरी विपरित घडल्याचा संशय मुलीच्या आईला आला. तसेच मुलीने त्या मुलांच्या घरीही येणे-जाणे बंद केले होते.
आईने मुलीला विश्वासात घेऊन आस्थेने विचारपूस केली. मुलगी रडायला लागली. आरोपींनी केलेले कृत्य आणि मोबाईलने काढलेल्या फोटोबद्दल आईला सांगितले. आईने मुलांच्या आईवडिलांशी चर्चा केली. चर्चेतून मुलांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी घटनेची कबुली दिली. मुलीच्या आईने कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही मुलांना ताब्यात घेतले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.