file photo
file photo 
विदर्भ

नागपूरच्या तापमानाचा नवा उच्चांक

सकाळवृत्तसेवा

नागपूर : विदर्भातील उष्णतेची लाट सोमवारी आणखी तीव्र झाली. उपराजधानीत कमाल तापमानाने या मोसमातील आणखी एक नवा उच्चांक नोंदविला आहे. दिवसेंदिवस तापमानात झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता नागपूरचा रेकॉर्ड मोडीत निघण्याची नाकारता येत नाही.
उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या विदर्भावर सूर्यनारायणाचा प्रकोप सोमवारीही तीव्रतेने दिसून आला. सर्वच जिल्ह्यांतील तापमानात सरासरी तीन ते चार अंशांची वाढ झाली. काल 46.5 अंशांवर गेलेला नागपूरचा पारा आज आणखी चढून 46.7 अंशांवर आला. यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले. नागपूरचा तापमानाचा सार्वकालिक विक्रम 47.9 अंश सेल्सिअस इतका आहे, जो मे 2013 मध्ये नोंदविण्यात आला होता. पाऱ्याचा चढता आलेख आणि हवामान विभागाने दिलेला रेड अलर्ट बघता हा विक्रम मोडीत निघण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विदर्भात ब्रह्मपुरी येथेही नागपूरइतकीच 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दोन्ही शहरांमध्ये राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा (46.5 अंश सेल्सिअस), चंद्रपूर (46.4 अंश सेल्सिअस), गडचिरोली (45.8 अंश सेल्सिअस), अकोला (45.3 अंश सेल्सिअस), अमरावती (45.0 अंश सेल्सिअस), यवतमाळ (45.0 अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा जाणवला.
उन्हाचे चटके व उकाड्यामुळे केवळ लहान मुले व ज्येष्ठ नागरिकच नव्हे, तरुणाईही प्रचंड त्रस्त आहेत. लाटेमुळे उष्माघातासारख्या जीवघेण्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी भरउन्हात सहसा घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विदर्भात लाटेचा प्रभाव आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT