नागपूर - पोलिस दलातील दंगा नियंत्रण पथकाला फुल बॉडी प्रोटेक्‍टर जॅकेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पोलिस महासंचालक सतीश माथूर व पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌.
नागपूर - पोलिस दलातील दंगा नियंत्रण पथकाला फुल बॉडी प्रोटेक्‍टर जॅकेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पोलिस महासंचालक सतीश माथूर व पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌. 
विदर्भ

उपोषणकर्त्यांना बळजबरीने उचलले

सकाळवृत्तसेवा

नागपूर - हलबा समाजबांधवांना आदिवासी जमाती व वैधता प्रमाणपत्र द्यावे या प्रमुख मागणीसाठी हलबा समाजबांधवांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पाचव्या दिवशी सोमवारी पोलिसांनी बळाचा वापर करीत बळजबरीने उपोषणकर्त्यांना उचलून मेयोत नेले. तिथेही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत आंदोलकांनी सलाईन लावून घेण्यास नकार दिला.

राष्ट्रीय हलबा जमात महामंडळातर्फे बांगलादेश पोलिस चौकीजवळ, नाईकवाडी हनुमान मंदिर मैदानावर गुरुवारी रात्रीपासून दीपक देवघरे यांच्या नेतृत्वात चंद्रभान पराते, सीताराम तारणेकर, गजानन बावणे, वामन भनारकर, नितेश बांदेकर यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. हलबा विद्यार्थ्यांना आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र त्वरित द्यावे. १९५० पूर्वीच्या पुराव्याचा आग्रह  न धरता जातवैधता प्रमाणपत्र द्यावे यासह विविध ११ मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत.

सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास पोलिसांचा ताफा उपोषणस्थळी येऊन धडकला.  दीपक देवघरे व कार्यकर्त्यांनी पोलिसांनी कडाडून विरोध केला. मात्र, पोलिसांनी बळजबरीने उपोषणकर्त्यांना रुग्णवाहिकेत कोंबले. पाचही उपोषणकर्त्यांना मेयो रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्‍टरांनी सलाईन लावून घेण्याचे केलेले आवाहन उपोषणकर्त्यांनी धुडकावून लावले. कोणत्याही परिस्थितीत सलाईन लावू देणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

हलबांच्या आंदोलनाला सरकार घाबरले आहे. म्हणूनच पोलिसांचा गैरवापर करून बळजबरीने उपोषणकर्त्यांना उचलून नेले. या घटनेमुळे हलबा समाज संतप्त झाला असून, त्याचे पडसाद १३ डिसेंबरच्या मोर्चात दिसून येतील.
- दीपक देवघरे, राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT