विधानभवन - हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात दाखल झाले आहे. याशिवाय सुमारे चार हजार पोलिसांचा ताफा सज्ज आहे. विधानभवनाच्या आत कुठलीही गडबड होऊ नये याकरिता दुर्बीण रोखून पाहणी करताना पोलिस.
विधानभवन - हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात दाखल झाले आहे. याशिवाय सुमारे चार हजार पोलिसांचा ताफा सज्ज आहे. विधानभवनाच्या आत कुठलीही गडबड होऊ नये याकरिता दुर्बीण रोखून पाहणी करताना पोलिस. 
विदर्भ

विरोधक आक्रमक, सत्ताधारी निश्‍चिंत

सकाळवृत्तसेवा

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. कर्जमाफी, शिष्यवृत्ती, मंत्र्यांच्या घोटाळ्याच्या माध्यमातून विरोधकांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. जनाक्रोश-हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून वातावरण तापवले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या कार्यकाळातील घोटाळे उघड करण्याचे संकेत दिल्याने विरोधक आक्रमक दिसत असतानाही सत्ताधारी निश्‍चिंत आहेत. 

अधिवेशनाचे कामकाज दोन आठवडे निश्‍चित करण्यात आले आहे. यात एकूण १३ विधेयके आणि सहा प्रलंबित विधेयकांचा समावेश आहे. याशिवाय लक्षवेधी, चर्चा आदी कामकाजांचाही समावेश आहे. सर्वाधिक प्रश्‍न कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, बोंडअळी, धानावरील तुडतुड्या याशिवाय कायदा व सुव्यवस्था या विषयावरचे आहेत. नॅशनल क्राइम ब्यूरोने अलीकडे सादर केलेल्या अहवालात मुख्यमंत्र्यांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यात नागपूरमधील गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचे म्हटले आहे.

देशातील सर्वाधिक गुन्हे असलेल्या शहरांमध्ये नागपूरचा समावेश केला आहे. याशिवाय बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव गेल्या दीड महिन्यापासून फरार आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जातात. 

या सर्व प्रश्‍नांची सरबत्ती अधिवेशनात होणार आहे. त्याची उत्तरेही सरकारला द्यावी लागणार आहेत. याशिवाय विरोधकांचा गोंधळ ठरलेलाच आहे. दोन आठवड्यांच्या अवधीत इतके सारे कामकाज संपवणे हे सरकारसमोर आव्हानच राहणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी उत्तराची जय्यत तयारी करून ठेवली आहे. याशिवाय आघाडीच्या कार्यकाळातील झालेल्या भ्रष्टाचाराचे हत्यार मुख्यमंत्र्यांच्या हाती असल्याने सत्ताधारी निश्‍चिंत आहेत.

अधिवेशनाचे कामकाज
एकूण विधेयके - १३
प्रलंबित विधेयके - ०५

विधानसभा
लक्षवेधी - १९४५
अर्धा तास चर्चा - २०२
अशासकीय ठराव - ४०१
तारांकित प्रश्‍न - ९६७५

विधान परिषद 
लक्षवेधी - ७६१
अर्धा तास चर्चा - ३७
अशासकीय ठराव - १६३
तारांकित प्रश्‍न - २९१६
प्रश्‍नांच्या माध्यमातून अर्धा तास चर्चा - ३४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT